two drivers drubbing from people in ratnagiri both are chemical water dropped in openly 
कोकण

एक टॅंकर सोडून रिकामा केला, दुसरा सोडण्याच्या तयारीत असतानाच चालकांना बसला चोप

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : लोटे एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांमधून येणारे घातक रासायनिक सांडपाणी रात्री उघड्यावर सोडणाऱ्या दोन टॅंकर चालकांना जमावाने भल्या पहाटे पकडून चोप दिला. संतापलेल्या ग्रामस्थांनी टॅंकरची तोडफोडही केली. लवेल आणि असगणी परिसरात यामुळे पहाटे तप्त वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही टॅंकर चालकांना जमावाने खेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

आठवड्यापासून मुंबई-गोवा महामार्गालगत लवेल आणि असगणी गावानजीक ओढ्यामध्ये रसायन ओतण्याचा प्रकार सुरू होता. ओढ्याचे पाणी पुढे नदीला मिळते आणि नदीकाठी पिण्याच्या पाण्याच्या नळ-पाणी योजना असल्याने ग्रामस्थ संतापले होते. काही जागरूक नागरिकांनी रात्री गस्त सुरू केली. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ओढ्यानजीक टॅंकर उभा राहिलेला दिसला. टॅंकरमधून रासायनिक सांडपाणी थेट ओढ्यात सोडले होते. हा प्रकार रंगेहाथ पकडण्यात आला. एक टॅंकर सोडून रिकामा केला होता, तर दुसरा सोडण्याच्या तयारीत होता.

ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत संतापाच्या भरात दगडफेक करत टॅंकरच्या काचा आणि हेडलाईट फोडले. टॅंकरचालक पळून लोटेत लपून बसले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर सीईटीपीचे अधिकारी चव्हाण यांच्यामार्फत या टॅंकर चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. लोटे एमआयडीसीमधील दोन कंपन्यांमधील सांडपाण्याबाबत गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सुरू असून या आधी अनेक वेळा घातक रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गालगत ओढे आणि नाल्यांमध्ये अज्ञात टॅंकरचालक रासायनिक कंपन्यांमधून आणलेले घातक रासायनिक सांडपाणी सोडतात. लोटे परिसरात तसंच महामार्गावर कशेडी घाटात असे प्रकार वारंवार घडतात. हा प्रकार नेमकं कोण करतं याबाबत माहिती मिळत नव्हती. रात्री आणि पहाटेच्या सुमारास हा प्रकार होत असे. त्याचा उलगडा यामुळे झाला.

पटवर्धन लोटेतही ‘प्रसाद’

खेडमधून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, घाणेखुंटचे अंकुश काते, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्ते पटवर्धन लोटे या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लपून बसलेल्या दोन्ही टॅंकरचालकांना शोधून आणून चांगलाच ‘प्रसाद’ दिला.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT