police  sakal
कोकण

Crime: खेडमध्ये पोलीस ऍक्शन मोडमध्ये केल्या दोन महत्वाच्या कारवाया!

सकाळ डिजिटल टीम

Konkan Crime : खेड तालुक्यातील नांदिवली-दंडवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.

याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दत्तात्रय कदम (वय ५८, रा. नांदिवली-दंडवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४५० रुपयांची ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.

पटवर्धन लोटेत जुगार अड्ड्यावर छापा


तर दुसरीकडे तालुक्यातील पटवर्धन लोटे येथील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये १२०३ रुपयांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सचिन सुरेश जाधव याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या मटका जुगार अड्ड्यांवर धाडी टाकण्याचे येथील पोलिसांचे सत्र सुरूच आहे. अवैध धंद्यांविरोधात पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मटका जुगार अड्डे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT