two opposite party comes together opposed to BJP on pawas ratnagiri 
कोकण

भाजपविरोधात दोन आघाड्या उभ्या ; एकत्र येऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ?

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : गट ग्रामपंचायत डोर्ले, दाभिळ आंबेरे पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले आहे. बहुजन विकास आघाडी शिवसेना व भाजप अशी तिरंगी लढतीची शक्‍यता आहे. पावस जिल्हा परिषद गटातील एकमेव ग्रामपंचायत गेली ४० वर्षे भाजपाप्रणित पॅनेलच्या ताब्यात आहे. युती असताना व नसतानाही भाजपने सातत्याने वर्चस्व राखले. त्यामुळे निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपाने सात जागांसाठी उमेदवार निश्‍चित केले आहेत.

भाजपाला पायउतार करण्याकरिता शिवसेना राष्ट्रवादीसह मैदानात उतरले आहेत. या जिल्हा परिषद गटांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नगण्य स्थान आहे. तरीसुद्धा डोर्ले, दाभिळ आंबरे ग्रामपंचायतीवर सातत्याने भाजपाचा झेंडा फडकत असल्यामुळे भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीतर्फे पॅनेल उभे केले आहे. 

या दोन्ही गावांमध्ये कुणबी समाजाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व असल्यामुळे नंदू मोहिते यांच्या कुणबी आघाडीने उमेदवार उतरवले आहेत. यश मिळाल्यास दोन्ही आघाड्या एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे.

 तिरंगी लढत निश्‍चित 

पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर यांना आपल्या गावातील भाजपाप्रणित पॅनेल निवडून आणण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. येथे तिरंगी लढत निश्‍चित झाली आहे. त्याचा फायदा कोणाला मिळणार, याकडे लक्ष आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सातही जागा निश्‍चित जिंकू

या संदर्भात पंचायत समितीचे माजी उपसभापती व माजी सरपंच बडू पाटकर म्हणाले, गेल्या ४० वर्षे गावामध्ये केलेली विकासकामे समाजोपयोगी विधायक कार्य व सर्व समाजामध्ये असलेले घरोब्याचे संबंध यामुळे ग्रामस्थ कायमच भाजपच्या पाठिशी उभी राहिले. त्यामुळे यापुढेही त्यांची साथ आजवर केलेल्या कामामुळे मिळणार. सातही जागा निश्‍चित जिंकू.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कर्नाटकातील कारवार बंदरातून सागरी प्रवासाला निघणार

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

SCROLL FOR NEXT