accident sakal
कोकण

मुंबई गोवा हायवेवर दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

दगडाला धडक बसल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर दुचाकी स्लिप होऊन दगडाला धडक बसल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळीच्या सुमारास मळगाव सोनुर्ली तिठा येथे घडला तात्काळ स्थानिकांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर दुखापत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अधिक उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात आले आहे

साईश शिवदास सावंत (१८) व शुभम शिवदास सावंत (२१) अशी त्या दोघांची नावे असून ते दोघे भाऊ असल्याचे समजते आज सकाळी काम आटपल्यानंतर हे दोघे भाऊ गोवा येथून कुडाळ नारुरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. यावेळी येथील मळगाव सोनुर्ली तिठा येथे आले असता रस्त्यावर साचलेल्या खडीवर त्यांची दुचाकी स्लिप झाली. यामुळे गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरील बाजूच्या दगडाला धडकून सर्व्हिस रोडवर जाऊन पडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

नागरिकांना अपघात झाल्याचे समजताच धाव घेत रक्तबंबाळ स्थितीत दोघांना उपचारासाठी रिक्षातून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. एकाच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होत आहे तर दुसऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT