two young men case in lanja ratnagir 
कोकण

दोन तरुणांच्या आत्महत्येने लांज्यात खळबळ ! 

सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : शहरात आठ दिवसांत घडलेल्या आत्महत्येच्या दोन घटनांनी शहर हादरून गेले आहे. राजू कोवळे आणि चेतन कोतवडेकर असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. या दोघांचा मित्र परिवारही मोठा होता. मात्र, त्यांची ही अकाली एक्‍झिट, मित्र परिवाराला जबर धक्का देऊन गेली. या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 


राजू कोवळे या तरुणाने 28 जूनला रात्री साडेआठ वाजता खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू कोवळे हे लांजा बाजारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता मंडळाच्या प्रत्येक कामात त्यांचा नेहमी सहभाग असे. घरगुती कारणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप राजूचा भाऊ प्रल्हाद कोवळे यांनी केल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना ताजी असतानाच लांजा रोहिदासवाडी येथील चेतन कोतवडेकर (वय 28) या तरुणाने चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चेतन याचे लांजा बाजारपेठेत चप्पल विक्रीचे दुकान आहे. हसतमुख स्वभावाच्या चेतनने चप्पल दुकानाच्या माध्यमातून रोजगाराचे साधन निर्माण केले होते. व्यवसायासाठी त्याने कर्ज घेतले होते, अशी चर्चा आहे. मात्र, कोरोनामुळे मार्चपासून बाजारपेठ बंद असल्याने त्याच्यासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता. यातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. मात्र नेमके कारण स्पष्ट होत नाही.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT