Two youths go missing in dam area in vengura 
कोकण

कपडे, पैशांचे पाकीट, चप्पल दिसले पण ते दोघे काय दिसेनात ; मग त्या युवकांची शोधाशोध झाली सुरू

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : तालुक्यातही आडेली धरण परिसरात दोन युवक बेपत्ता झाले असून ते धरणात बुडाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी दोन युवकांचे कपडे, पैशांचे पाकीट, चप्पल आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. 

आडेली धरण परिसरात दोन युवक बेपत्ता


दरम्यान त्यांच्या ओळ्खपत्रावरून हे युवक मळगाव येथील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. काल या दोन्ही युवकांचा वाढदिवस होता. सायंकाळपासून हे दोन्ही युवक बेपत्ता असल्याने त्यांची शोधाशोध सूरु होती. आज सकाळी सुद्धा त्यांची शोधाशोध सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक तानाजी मोरे सहित हेड कॉन्स्टेबल पालकर, कॉन्स्टेबल काळसेकर घटनास्थळी दाखल झाले असून त्या युवकांची शोधाशोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: मिसिंग लिंक मार्गावर पुणे–मुंबई वाहतूक बंद; मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत

Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

Latest Marathi News Update: दिवसभरातील पावसाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Khadaki Rain : खडकी भागात मुसळधार पाऊस; गुरुद्वारा आणि टीकाराम महाविद्यालय परिसरात पाणीच पाणी

Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

SCROLL FOR NEXT