

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मार्गावर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र, मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू असून या दिशेने वाहनांची नियमित ये-जा सुरू आहे.