uday samant on preventing journalists from reporting agitation over ratnagiri barsu refinery project survey
uday samant on preventing journalists from reporting agitation over ratnagiri barsu refinery project survey  uday samant
कोकण

Ratnagiri Refinery News : रिफायनरी आंदोलनस्थळी पत्रकारांशी अरेरावी; पालकमंत्री उदय सामंत म्हणाले…

रोहित कणसे

Ratnagiri Refinery Updates : बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, मात्र या सर्वेक्षणाला स्थानिकांनी तीव्र विरोध नोंदवला आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्वेक्षण झालं म्हणजे दुसऱ्याच दिवशी रिफाइनरीचं काम सुरू होणार नसल्याचं म्हटलं आहे, तसेच सामंतानी आंदोलनस्थळी पोलिसांकडून माध्यमांच्या प्रतिनीधींना झालेल्या अरेरावीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिनीधीनी वातावरण दाखवत असताना ग्राउंड रिअॅलिटी दाखवली पाहीजे असं माझं वयक्तीक मत आहे. जिल्हाधीकारी आणि पोलिस आयुक्तांकडून काढलेल्या माहितीनुसार विरोध होत आहे, पण तो आम्ही लोकशाहीच्या पध्दतीने समजूत घालून दूर करू शकतो असे उद्य सामंत म्हणाले आहेत.

आजचं सर्वेक्षण झालं म्हणजे प्रकल्प दोन दिवसांत सुरू होणार आहे असं नाही, आधी पूर्ण तपासणी होईल त्यानंतर प्रकल्प तेथे होईल की नाही ते ठरेल. आम्ही जनतेला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय असे सामंत म्हणाले आहेत. सामंत हे 'एबीपी माझा'शी बोलत होते.

म्हणून कारवाई केली...

सध्या जोपर्यंत चाचणी फायनल होत नाही तोपर्यंत आपण प्रकल्पाबद्दल काही सांगू शकत नाहीत, पण सांगीतलं जात आहे की दडपशाही केली जातेय. पण पूर्वीपासूनच पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी समंजसपणाची भूमीका घेतली आहे. पण बाहेरून काही लोकं तेथे येऊन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे असे सामंत यावेळी म्हणाले.

पोलिसांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करत परत इथं दिसायचं नाही सांगण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यावर स्पष्टीकरण देताना रत्नागीरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, याआधी खात्री करून घ्या की अशी दडपशाही झाली का? गैरसमज किंवा वयक्तिक आकसापोटी हे सांगितलं जात असेल तर त्याची खात्री करून घेतली पाहिजे असे सामंत म्हणाले.

आंदोलनस्थळी दडपशाही केली जात नाही. ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे, त्यासंदर्भात पूर्ण माहिती घेण अपेक्षित आहे. पण दडपशाही झाली असेल तर पालकमंत्री म्हणून मी त्याचा जाब विचारेल आणि संबंधीतांवर कारवाई देखील करेल असेही सामंत यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT