uday samant press conference sindhudurg 
कोकण

"जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय उडवता येणार नाही"

राजेश शेळके

रत्नागिरी: किनार्‍यावरील वॉटर स्पोर्टस्ला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यांनी कोरोनापासून सारासार सर्व विचार करून परवानगी दिली असेल. त्यामुळे त्यांचा निर्णय मेरीटाईम बोर्डाला उडवून लावता येणार नाही. त्यांनी त्याबाबत मार्गदर्शन मागवावे आणि यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे स्षष्ट मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते. कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायिकांना बसला. दिवाळीत मंदिरे सुरू झाली आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. गणपतीपुळेसारख्या किनार्‍यावर दररोज चार ते साडेचार हजार पर्यटकांनी हजेरी लावली. गुहागर, दापोलीसह रत्नागिरी तालुक्यातील अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. त्यानिमित्ताने वॉटर स्पोर्टस् सुरु झाले. पण तिनच दिवसात मेरी टाईम बोर्डाकडून ते बंद करण्याच्या सूचना आल्या. त्याची कडक अंमलबजवणी सुरू आहे. जिल्हाप्रशासनाने मेरी टाईम बोर्डाच्या परवानगीने कोरोनाच निकष पाळून खेळ सुरु करा अशा सूचना दिल्या होत्या; परंतु मेरीटाईम बोर्डाला त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश प्राप्त न झाल्यामुळे खेळ बंद ठेवावे लागले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी किनार्‍यावर वॉटर स्पोर्टस्ला परवानगी दिली आहे. मात्र मेरी टाईम बोर्डाला मंत्रालयीनस्तरावरुन आदेश प्राप्त न झाल्यामुळे ऐन पर्यटन हंगामात वॉटर स्पोर्टस् बंद ठेवण्याची वेळ या व्यवसायिकांवर आली आहे. उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर ते म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने वॉटर स्पोर्टस् बंद केल्या होत्या. आता अनलॉक सुरू असल्याने याचा सारासार विचार करूनच जिल्हाधिकार्‍यांनी वॉटर स्पोर्टस्ला परवानगी दिली आहे.
त्यांचा निर्णय मेरीटाईम बोर्डाला उडवून लावता येणार नाही.

दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव

दोन यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा वॉटर स्पोर्टस् व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. यंदाचाही हंगाम निसटणार का, अशा विवंचनेत ते आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मेरीटाईम बोर्ड यांनी एकत्रित निर्णय घेण्याची गरज होती. मात्र त्यांच्यातील समन्वयाअभावी व्यवसाय सध्या थांबला आहे.

संपादन- अर्चना बनगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT