uday samant said cultural center start said uday samant in chiplun ratnagiri 
कोकण

मंत्री उदय सामंत चिपळूणातील सांस्कृतिक केंद्राच्या प्रेमात

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : निवडणुकीच्यावेळी राजकारण करा पण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करा, अशी सूचना उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना केली. तांत्रिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपले अधिकार वापरावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे. चिपळूण पालिकेच्या मालकीचे अनेक प्रकल्प तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. हे सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु असल्याने मंत्री सामंत हे सांस्कृतिक केंद्राच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. 

चिपळूण शहरातील भाजी मंडई तयार होऊन पालिकेने लिलाव प्रक्रिया राबवली. मात्र भाजी विक्रेत्यांनी त्याला विरोध केला. पालिका प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. अशीच अवस्था इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची झाली आहे. सांस्कृतिक केंद्र तयार झाले आणि नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी केंद्राच्या उद्घाटनाचा विषय सर्वसाधारण बैठकीच्या विषय पत्रिकेवर घेतला. त्याला शिवसेना आणि महाविकास आघाडीत सामील झालेल्या मित्र पक्षांनी विरोध केला. 

निविदा प्रक्रिया न करता सांस्कृतिक केंद्राचे वाढीव काम झाले असल्याची तक्रार महाविकास आघाडीने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू असताना मंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी सांस्कृतिक केंद्राला भेट दिली होती. केंद्राच्या कामाचे कौतुक करत हे केंद्र मनापासून आवडल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक बाबींची पूर्तता करून सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली होती. तरीदेखील सांस्कृतिक केंद्राचा पडदा तांत्रिकबाबीत अडकून राहिला. त्यामुळे आज मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा शिवसेना नगरसेवक, मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. 

यावेळी मुख्याधिकारी विधाते यांनी तांत्रिक बाबी आणि निविदा प्रक्रियेची माहिती दिली. सांस्कृतिक केंद्राचे काम करणार्‍या ठेकेदाराने वाढीव कामे केली आहेत. नव्याने निविदा प्रक्रिया करताना जुन्या ठेकेदाराला हे काम मिळाले नाही तर त्याचे नुकसान होणार आहे. हा मुद्दाही बैठकीत मुख्याधिकार्‍यांनी मांडला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याची सूचना केली आहे. सांस्कृतिक केंद्र किती दिवसात खुले होईल हे नक्की सांगता येणार नाही. मात्र पुढील पंधरा दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण होतील. अशी अपेक्षा मंत्री सामंत यांनी व्यक्त केली. 

"एखादी वास्तू तयार होऊन तिचा वापर झाला नाही तर ती लवकर खराब होते. चिपळूण जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी आहे. येथील रसिकांसाठी हे केंद्र लवकर सुरू व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सांस्कृतिक केंद्राचे लवकरच लोकार्पण व्हायला हवे."

- उदय सामंत, उच्चशिक्षणमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fraud: १३.१७ कोटी रुपयांची फसणूक, मुंबईत २१ वर्षीय एका तरुणाला अटक, काय आहे प्रकरण?

Baramati Vidhansabha Byelection : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न; दिल्ली दरबारी होणार काँग्रेसचा निर्णय

Dowry Harassment Case : भाजीत केस सापडल्याने निर्दयी मारहाण, छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; 5 तोळं सोनं, 2 लाख हुंडा देऊनही पतीचं नाही झालं समाधान

Kapil Dev: फक्त IPL नव्हे, देशासाठी खेळण्याचं स्वप्न बाळगा; कपिल देवांनी तरुणांना दिला मोठा मंत्र म्हणाले...

Latest Marathi News Live Update : सिल्लोड आगारातील कर्मचाऱ्याची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT