uday samant said for shiv sena win the grampanyat election in ratnagiri in press conference 
कोकण

'त्यामुळे त्यांनी शिव्या घालाव्या, आम्ही ओव्या म्हणतो' ; सामंत यांचा नीलेश राणेंना चिमटा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवसैनिक एकदा पेटून उठला की काय करतो, हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून विरोधकांनी लक्षात ठेवावे. कोणी किती दावा केला असला तरी रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील ६३ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्‍चित. बंडखोरांना निकाल हीच कारवाई आहे. काही लोक जेवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलतील, तेवढा माझा सुसंस्कृत मतदार सेनेबरोबर राहातो. त्यामुळे त्यांनी शिव्या घालाव्या, आम्ही ओव्या म्हणतो, असा चिमटा उदय सामंत यांनी नीलेश राणे यांना नाव न घेता काढला. 

खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींपैकी ३२४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान होतील. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ६३ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिवसेना प्रयत्न करून ६३ पैकी ६० ग्रामपंचायतींवर सरपंच विराजमान करेल.

रत्नागिरी तालुक्‍यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत. गावपॅनल काही ठिकाणी विजयी झाले आहे. त्यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायतींवरील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. रत्नागिरी तालुक्‍यातील भरघोस यशाबद्दल उपस्थित असलेल्या बंड्या साळवी, चाळके, बाबू म्हाप आणि शिवसैनिकांचे त्यांनी कौतुक केले. 

ॲड.पटवर्धन यांची खिलाडूवृत्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी खिलाडूवृत्ती दाखवली. त्यांनी शिवसेनेला मिळालेल्या विजयासंदर्भात फोन करून माझे आणि बंड्या साळवी यांचे अभिनंदन केले. ॲड. पटवर्धन यांच्या या राजकीय खिलाडुवृत्तीचे कौतुक वाटते. मंत्री म्हणून त्यांना विकासात्मक कामासाठी कोणतीही मदत लागली तर ती मी करण्यास तयार आहे.

आता त्यांच्या अस्तित्वाचे काय ?

विरोधकांनी निवडणुकीपूर्वी तीन-चार दिवस शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत विधाने केली होती. त्यामुळे आमचा शिवसैनिक पेटून उठला आणि शिवसेनेचा मोठा विजय झाला. आता त्यांच्या अस्तित्वाचे काय झाले, याचा अंदाज त्यांना आला आहे. काहींनी शिवसेनेशी बेईमानी करून बंडखोरी केली. त्यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची गरजच नाही.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

SCROLL FOR NEXT