Uddhav Thackeray esakal
कोकण

Uddhav Thackeray : 'शिवसेनेला 2014 च्या निवडणुकीतच संपविण्याचा डाव होता'; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

गुंडांना सोबत घेऊन हुकुमशाहीच्या आधारे आयारामांची मंदिरे बांधत सुटलेल्या भाजपला कायमचे तडीपार करा.

सकाळ डिजिटल टीम

'घराणेशाहीविषयी आमच्यावर बोट ठेवणारा माणूस आधी घरंदाज आहे का हेही तपासायला हवे. युती काळात असलेल्याचे संधीचे सोने करण्याऐवजी माती केलीत.'

चिपळूण : गुंडांना सोबत घेऊन हुकुमशाहीच्या आधारे आयारामांची मंदिरे बांधत सुटलेल्या भाजपला कायमचे तडीपार करावे, कोकणातील पाणबुडी, मुंबईचे डायमंड मार्केट, एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील ४० गद्दार देखील गुजरातला पळवले. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसच्या (Congress) काळातील सरकारी योजना देखील पळविण्याचे काम हे सरकार करीत आहे. पंतप्रधान स्वनिधी फंडात कोट्यावधीचा निधी या ना त्या मार्गाने जमा होत आहे. या फंडात मोठा घोटाळा असून त्याचा हिशेब आधी जनतेला द्या. त्यानंतरच ईडीच्या कारवाया करा, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.

शहरातील इंदिरा गांधी (Indira Gandhi) सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनसंवाद जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीतच संपविण्याचा डाव होता. तेव्हा पक्षप्रमुख म्हणून आपला पाठिंबा घेतला होता. पाठिंबा का चालला, त्यावेळी पंतप्रधानांना दिलेल्या पाठिंबा पत्रावर पक्षप्रमुख म्हणून आपली सही कशी चालली. २०१८ साली युती तुटली तेव्हा मातोश्रीवर भाजप का आला होता. मिंधे गटाकडे का गेला नाहीत.

घराणेशाहीविषयी आमच्यावर बोट ठेवणारा माणूस आधी घरंदाज आहे का हेही तपासायला हवे. युती काळात असलेल्याचे संधीचे सोने करण्याऐवजी माती केलीत. आता बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेच्या न्यायालयापेक्षा जनतेचे न्यायालय मोठे आहे. आज माझ्या हाती द्यायला काही नसताना माझ्या सोबत जो जनसागर ठामपणे उभा आहे. त्यावरूनच जनतेचा विश्वास लक्षात येतो. त्याच्यासारखे भाड्याने कार्यकर्ते आणण्याची वेळ अजून आपल्यावर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT