pali
pali 
कोकण

सुधागडामध्ये वनविभागाकडून गावठी दारुभट्ट्या उध्वस्थ

अमित गवळे

पाली - बेकायदेशीर गावठी दारु निर्मीती व विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी सुधागड वनविभागाने कंबर कसली आहे. सुधागड वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागशेत विभागातील गावठी दारुच्या हातभट्ट्या नुकत्याच उध्वस्त करण्यात आल्या आहेत.

नागशेत हद्दितील पिंपळोली व नागाव येथे जंगलात अवैध्य दारु निर्मिती व विक्रि होत असल्याची खबर वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने तत्काळ धाडसत्राचे अायोजन केले. व दारु भट्ट्यांच्या ठिकाणी धाड टाकून दारु निर्मीतीसाठी लागणारे नवसागर रसायन, काळा गुळ व अन्य साहित्य नष्ट केले. या कारवाईत नागशेत वनपाल एम.एम.दबडे, नागशेत वनरक्षक एस.ए. डोंगरे, पिंपळोली वनरक्षक बी.एम. हाटकर, घोटावडे वनरक्षक एम.एस. घुडे, सावे वनरक्षक के.आर. गायकवाड, खडसांबळे वनरक्षक टी.टी. ओव्हाळ, सुधागड पुर्व वनरक्षक ए.जी. ओव्हाळ, पाच्छापूर वनपाल आर.एम. म्हात्रे, डी.के. तळे, गावंढे वनरक्षक आर.व्ही.पोले आदिंसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग होता.

सुधागडातील वनभाग कार्यक्षेत्रात अवैध्य गावठी दारु निर्मीतीवर शंभर टक्के बंदी आणण्याच्या दृष्टीकोणातून वनविभाग प्रयत्नशिल असल्याचे वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांनी सकाळला सांगितले. रायगड जिल्ह्यात सुधागड वनविभागाचे वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या प्रभावी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT