unauthorized trawler caught redi port konkan sindhudurg 
कोकण

रेडी बंदरात अनधिकृत ट्रॉलर पकडला

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथील रेडी बंदर समोरील समुद्रात अनधिकृत मच्छीमारी करत असलेल्या गोवा राज्यातील ट्रॉलरवर येथील सागरी सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये सापडलेल्या मासळीचे लिलाव करून पुढील कारवाईसाठी हा ट्रॉलर येथील बंदर समुद्रात अवरुद्ध केल्याची माहिती परवाना अधिकारी मत्स्य विभाग चिन्मय जोशी यांनी दिली. 

सागरीसुरक्षा विभागाचे सुरक्षा रक्षक राजेश कुबल, हर्षद टाककर व पोलीस श्री. पिळगावकर हे 31 जानेवारीला रात्री 3.30च्या सुमारास गस्तीवर असताना रेडी बंदरासमोरील 18 वाव समुद्रात गोवा राज्यातील रॉयल सी नामक (आय एन डी जी ए 01- 398) ट्रॉलर्स मच्छीमारी करताना आढळला. पुढील कारवाईसाठी ट्रॉलर्स येथील बंदरात आणला असता यात मिळालेल्या मासळीचे 30 हजारांना लिलाव करण्यात आले. पुढील कारवाईसाठी ट्रॉलर येथील बंदर येथे ठेवल्याची माहिती परवाना अधिकारी श्री. जोशी यांनी दिली. यावेळी पोलिस कर्मचारी अमर कांडर उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

तो फार कमी कार्यक्रमांना यायचा... अदिती द्रविडने सांगितला काका राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा अनुभव

Latest Marathi News Live Update: ॲग्रीस्टॅकमुळे कापूस खरेदी नोंदणी जलद होणार - जयकुमार रावल

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

SCROLL FOR NEXT