under the pocso act three people arrested by a police in ratnagiri from one case 
कोकण

कोकण : तिघांविरोधात पॉस्को ; नवऱ्यासह प्रियकरालाही अटक

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : अल्पवयीन विवाहित मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यावर गुहागर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात तिच्या दोन कथित प्रियकरांबरोबरच अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.

गुहागर तालुक्‍यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह चिपळूण तालुक्‍यातील मार्गताम्हणे येथील तरुणाबरोबर १५ दिवसांपूर्वी झाला होता. विवाहानंतर १५ दिवसांनी सदर अल्पवयीन तरुणीच्या पोटात दुखू लागले. रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत ही तरुणी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे रत्नागिरी पोलिस ठाण्यात बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पॉस्को) अज्ञाताविरोधता गुन्हा दाखल केला होता.

याचा तपास करताना सदर मुलीसोबत २ मुलांचे प्रेमसंबध असल्याचे उघड झाले. या पैकी एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. या तरुणाचे २०१८ पासून या मुलीवर प्रेम होते. ही दोघं एकमेकांना भेटत होती. असे चौकशीत समोर आले. तसेच ही मुलगी अल्पवयीन असताना तिच्यासोबत लग्न करणाऱ्या मार्गताम्हाणे येथील तरुणावर देखील गुन्हा दाखल केला.


पारंपरिक पद्धतीने विधिवत विवाह

दरम्यान, अल्पवयीन मुलीसोबत पारंपरिक पद्धतीने विधिवत विवाह झाला. विवाह ठरविणाऱ्यांपासून, विवाहाचे विधी करणाऱ्यापर्यंत सर्वांवर कारवाई होऊ शकते. तपास चिपळूण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT