Narendra Modi Narayan Rane
Narendra Modi Narayan Rane esakal
कोकण

PM मोदींच्या नेतृत्वात भारत 2047 पर्यंत जगात महासत्ता बनेल; नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

''आज कोकण, महाराष्ट्र गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा देशभर फिरत आहे.”

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतिपथावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने मार्गक्रमण करत असलेला भारत २०४७ पर्यंत जगात महासत्ता बनेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी वायंगवडे येथे व्यक्त केला.

विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संकल्प यात्रा विकास रथ तालुक्यातील वायंगवडे गावात आज दाखल झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, बाबा परब, प्रशांत पानवलकर, विशाल तनपुरे, तहसीलदार वर्षा झालटे, आप्पासाहेब गुजर, वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, संजय गोसावी, विनायक परब, जयवंत परब, पोईप सरपंच श्रीधर नाईक, आशिष हडकर उपस्थित होते.

यावेळी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, भाजीपाला मिनिकीट लाभार्थी, बेबी किट, यांत्रिकीकरण पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जयवंत परब, सुषमा परब, सौम्या मेस्त्री, निधी सुद्रीक या लाभार्थ्यांनी विचार मांडले. सर्व सामान्य शेतकरी, महिला तरुण यांच्यापर्यंत विविध योजना तळागाळात पोहोचवून मोदी सरकार सर्व सामान्य जनतेला लाभ मिळवून देत आहे. मोदी सरकारचे आम्ही आभारी आहोत, अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी आरोग्य विभाग, बँक अधिकारी यांनीही माहिती दिली.

प्रभाकर सावंत म्हणाले, “९० च्या दशकात राणे यांनी कोकण विकास, महाराष्ट्र विकासाची संकल्पना मांडली. आज कोकण, महाराष्ट्र गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा देशभर फिरत आहे.”

यावेळी श्री. राणे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जनतेशी मुक्तपणे संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ जनतेचे जीवनमान सुधारले पाहिजे. गावागावातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी उद्योग व्यवसाय व अन्य सर्वच क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. भारत सरकारच्या या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. उच्च शिक्षण तसेच उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधावी. रोजगार निर्माण करणारे उद्योजक व उद्योग निर्माण होण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहील.”

ते पुढे म्हणाले, “गावातच मिळणाऱ्या अनेक विविध वस्तूंपासून मोठ्या उद्योग निर्मितीची शक्यता आहे. शेणापासून विविध प्रकारची उत्पादने घेतली जातात. रंग, गॅस, विज निर्मिती होते. फणस, चिंच यांच्या बियांपासून औषधी पावडर मिळते. अनेक आजारांवर उपयोगी आहे. नारळ उद्योगातूनही अनेक प्रकारच्या वस्तू, मोठे उद्योग निर्मितीची शक्यता आहे. गावातील लोकांनी या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT