Underworld don Dawood Ibrahim plot in Lotte auction on December 1 
कोकण

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव

गोविंद राठोड़

खेड (रत्नागिरी) :  कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील ६ वडिलोपार्जित मालमत्तांच्या लिलावानंतर लोटे येथे पेट्रोलपंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्यानुसार स्मगलिंग अँण्ड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जागेची पाहणी केली. या लिलाव प्रक्रियेकडेच आता साऱ्यांच्या नजरा रोखल्या आहेत.


 मुंबकेतील दाऊदच्या ६ मालमत्तांची लिलाव प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. दाऊदचा दुमजली बंगला दिल्लीतील अँड. अजय श्रीवास्तव यांनी ११ लाख ३० हजाराची बोली लावून विकत घेतला. याशिवाय १५३ सर्व्हे व क्रमांकाची मालमत्ता ४ लाख ३ हजार रुपयांना खरेदी केली होती अन्य चार मालमत्ता सर्वोच्च न्यायालयातील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी ७ लाख १८ हजार रूपयांना खरेदी केल्या होत्या. 


मुंबकेतील ६ मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेनंतर लोटे येथे ३० गुंठे क्षेत्रात असलेल्या १ डिसेंबरला होणार आहे. दाऊद याने हा भूखंड पेट्रोलपंपासाठी खरेदी केला होता, अशी माहिती जाणकार देतात. या भूखंडाचाही व्हिडीओ काँन्फरन्सव्दारे लिलाव होणार आहे. यापाश्वभूमीवर स्मगलिंग अँण्ड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बोलीधारकांसह भूखंडाची पाहणी केल्याची माहिती काल उशिरा मिळाली.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT