fish 
कोकण

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर अद्भुत मासा

सकाळ वृत्तसेवा

रायगड : दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर वर भलामोठा देवमासा सापडल्यानंतर आता श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर अद्भुत मासा सापडला आहे. रात्री समुद्राच्या लाटांसोबत मृत अवस्थेत हा मासा किनाऱ्यावर आला. आठवड्याभरात दोनदा अशा प्रकारे वेगळे मासे किनाऱ्यावर आल्याने माशाला पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोकांनी आणि पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे.

साधारणता 5 फूट लांब आणि दीड फूट जाडीचा हा मासा असून त्याच वजन अंदाजे 100 किलो असल्याचे सांगितले जात आहे. गोबरा माशाप्रमाणे हा मासा दिसत असून आकाराने तोंडाकडे मोठा तर शेपटीकडे निमुळता असून अंगावर चकाकणारा सोनेरी रंग आहे. शिवाय या माशाच्या अंगावर काळे ठिपके असून एखाद्या तीक्ष्ण बाणासारखे काटे देखील आहेत.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील समुद्र किनाऱ्यावर हा अद्भुत मासा सापडला असून या माशाला पाहण्यासाठी आसपासच्या लोकांसह पर्यटकांनी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे. खोल समुद्रात सापडणारा हा मासा भरती - ओहोटीमुळे किंवा एखाद्या बोटीच्या पंख्याला धडकून जखमी झाल्याने हा मासा किनाऱ्यावर आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि मत्स्य विभागाला याची माहिती देण्यात आली असून लवकरच या माशाची विल्हेवाट लावली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT