कोकण

अर्बनची स्थानिकांसाठी व्याज परतावा कर्ज योजना

CD

चिपळूण अर्बनची बँकेची
व्याज परतावा कर्ज योजना

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण अर्बन बँकेने स्थानिक उद्योजकांकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत व्याज परतावा कर्जयोजना सुरू केली आहे. नवीन व्यवसाय उभारणीसाठी व व्यवसाय विस्तार, वाढीकरिता सदरच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे अध्यक्ष निहार गुढेकर यांनी सांगितले. या योजनेमध्ये केल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याची मर्यादा १५ लाख असून परतफेडीचा कालावधी ८४ महिन्यापर्यंत राहाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत ४.५० लाखापर्यंत व्याजामध्ये परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मिळत असतो. कर्ज हप्ते नियमित परतफेड ठेवण्याची जबाबदारी कर्जदारांची आहे, तरच व्याज परतावा मिळतो. या योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या गुगल पे, फोनपे याचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेकरिता इतर नियम व अटी लागू राहातील. अधिक माहितीसाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क करून या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गुढेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT