vaccination Planning Sindhudurg district 
कोकण

लसीकरणासाठी सिंधुदुर्गात नियोजन

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी - राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहिम लवकरच सुरु होणार आहे. ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा परिषद अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, नगरपरिषद, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी जोशी पुढे म्हणाले, ""कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लाभार्थ्यांच्या याद्या तातडीने तयार करण्याचे काम करावे, यासाठी डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी. लस साठविण्यासाठी डीप फिजर यांची पाहणी करुन देखभाल व आवश्‍यक असल्यास दुरुस्ती तातडीने कराव्यात. लस वाहतुकीसाठी वाहनांचे नियोजन करावे. वाहनांची संख्या कमी पडत असल्यास वाहन भाड्याने घेण्याची प्रक्रिया तात्काळ राबवावी. लसीकरणाबाबत शासनस्तरावरुन लसीकरणाच्या अंमलबजावणी रुपरेषा व मार्गदर्शक सूचना तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या सूचना प्राप्त होताच त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.'' 

कर्मचाऱ्यांना आवाहन 
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर म्हणाले, ""जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ज्याठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधिच्या जागा तातडीने निश्‍चित कराव्यात. लस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिरांचे तातडीने आयोजन करावे. लस देण्यासाठी सुरक्षा विषयक सामुग्रीची यादी तयार करून मागणी संबंधित यंत्रणांकडे पाठवावी. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्यांना ही लस प्राधान्याने देणात येणार असल्याने कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू करावी. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT