vaccination in ratnagiri only three centers storage of vaccine finished 
कोकण

रत्नागिरीत लशींचा तुटवडा; फक्त तीनच केंद्रांवर लसीकरण!

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच जिल्ह्यात सुरू केलेल्या ९१ केंद्रांपैकी आता केवळ ३ केंद्रांवरच कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, कळंबणी व केळशी या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी केवळ ८०० लसीचे डोस शिल्लक आहेत.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला होता.

जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते; मात्र गेल्या पंधरा दिवसात पुरेशी लसच उपलब्ध न झाल्यामुळे केंद्र वाढविण्याऐवजी कमी करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत राबविलेल्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला होता. जिल्ह्यातील ९७ हजार लोकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिनची लस घेतली होती. 

जिल्ह्यातील कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपुष्टात आला असून दुसरा डोस देण्यासाठीही मात्रा शिल्लक नसल्याची माहिती पुढे आली आहे. कोव्हॅक्‍सिनचा काही साठा उपलब्ध आहे; मात्र २८ दिवसांनी दुसरा डोस द्यावयाचा असल्याने नवीन व्यक्‍तींसाठी त्याचा वापर केला जात नाही. दुसऱ्या डोससाठी ती मात्रा ठेवण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

महोत्सवासाठी मिळू शकते लस

केंद्र सरकारने लस महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे दोन दिवसात लस मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे; मात्र शनिवारी (ता. १०) सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाकडून गाडी कोल्हापूरला रवाना झालेली नाही.

वेळेत न मिळाल्यास...

रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाकडे १ लाख ७० हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. ती वेळेत न मिळाल्यास लसीकरण मोहीम ठप्प होण्याची शक्‍यता आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात ९१ केंद्रे सुरू करण्यात आली होती. लस उपलब्ध न झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय, कळंबणी (खेड), केळशी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीच लसीकरण सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT