landslide in Karul Ghat  esakal
कोकण

Karul Ghat : करूळ घाटात पुन्हा दरड कोसळली; वैभववाडी-कोल्हापूर महामार्गावर वाहतूक ठप्प

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे किरवे ते लोंघेदरम्यान पुन्हा रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे.

वैभववाडी : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी काही ठिकाणी अजूनही पडझडीच्या घटना घडत आहेत. वैभववाडी-कोल्हापूर महामार्गावर (Vaibhavwadi-Kolhapur Highway) किरवे ते लोंघेदरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. करूळ घाटात (Karul Ghat) पुन्हा रस्त्यावर डोंगर कोसळला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. अधूनमधून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी पडत आहेत. मात्र, त्यानंतर काही काळ पाऊस पूर्ण उघडीप देत आहे. सोमवारी सायंकाळी तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील मांडकुली, खोकुर्ले येथील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू केली होती.

परंतु, कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे किरवे ते लोंघेदरम्यान पुन्हा रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. एकीकडे पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत.

वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील करूळ घाटरस्त्यावर काल पुन्हा डोंगर कोसळला. दगड, माती आणि झाडांचा भरावाने ६० ते ७० मीटरचा रस्ता व्यापला आहे. सध्या हा घाटरस्ता वाहतुकीस बंद असला, तरी नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचे दरडीमुळे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आज सर्वत्र पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT