robbery sakal
कोकण

वैभववाडीत चोरट्यांचा धुमाकुळ,एका रात्रीत फोडली आठ दुकाने

गेल्या दोन वर्षातील पहिलाच प्रकार तहसिलदारांच्या बंगल्याचा देखील समावेश

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : वैभववाडी शहरातील सहा आणि करूळातील दोन अशी एकुण आठ दुकाने एकाच चोरट्यांनी फोडली.या प्रकारामुळे वैभववाडीत खळबळ माजली असुन व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकाच रात्रीत इतकी दुकाने फोडण्याचा गेल्या दोन वर्षातील पहिलाच प्रकार आहे.तहसिलदारांचा बंगला देखील चोरट्यांनी फोडला आहे.

वैभववाडी शहरात काल रात्री चोरट्यांनी अक्षरक्ष धुमाकुळ घातला.शहरातील स्वरगंगा इलेक्ट्रीक,गोखले हॉटेल,नितीराज जनरल स्टोअर्स,वैभव पोरे भांडी दुकान,कुडाळकर ज्वेलर्स अशी पाच दुकाने आणि तहसिलदारांचा बंगला चोरट्यांनी फोडला.याशिवाय करूळ गावातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत.आज सकाळी वैभववाडी शहरातील व्यापारी दुकाने उघडण्यास आले असता एकच खळबळ उडाली.

दुकानाच्या दरवाजांना लावलेली कुलुपे,कडी कोयंडे तोडलेले व्यापाऱ्यांच्या निर्दशनास आले.त्यामुळे ही माहीती तत्काळ पोलीसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई,मारूती साखरे,अभिजीत तावडे,यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.त्यांनी फोडलेल्या दुकानांची पाहणी करण्यास सुरूवात केली आहे.आतापर्यत पाच व्यापाऱ्यांनी पोलीसांत माहीती दिली आहे.आणखी काही व्यापाऱ्यांची दुकाने फोडली असण्याची शक्यता आहे.

कोणत्या व्यापाऱ्यांची किती रक्कम किवा काही साहीत्य चोरीला गेले याची माहीती पोलीस घेत आहेत.त्यामुळे नेमकी किती मुद्देमालाची चोरी झाली हे समजु शकलेले नाही.एकाच रात्रीत आठहुन अधिक दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण आहे.गेल्या दोन वर्षात प्रथमच एका रात्रीत इतक्या मोठया प्रमाणात दुकाने फोडण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates List: भाजपची मोठी स्ट्रॅटेजी मीटिंग! विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 12 जणांची चढाओढ; कोण होणार फायनल? लिस्ट आली समोर

Nagpur News: काझीला अमेरिका, बेंगळुरूमधून फंडिंग?; एटीएसकडून होणार तपास; एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू

शेवटी आई ती आईच! सहलीवरून परतलेल्या लेकीला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचली ऐश्वर्या, Viral Video

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिणगी, आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं

राज्यात ४८ तास धोक्याचे! मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह विदर्भावर वादळी पावसाचं संकट; १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT