Kokan  Sakal
कोकण

वैभववाडी : करूळ घाटात वाहतुकीचा खोळंबा

वाहनांची रांग ; खड्डे बुजविण्याच्या कामामुळे एकेरी वाहतुक

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : दुरावस्था झालेल्या करूळ घाटातील खड्डे बुजविण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणने सुरूवात केली आहे.या कामात व्यत्यय येऊ नये म्हणुन या मार्गाने सध्या एकेरी वाहतुक सुरू ठेवण्यात आली आहे. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला असुन घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

करूळ घाटरस्त्याची दुरावस्था झाली आहे.पाच ते सहा फुटाचे खड्डे घाटरस्त्याला पडले असल्यामुळे वाहने कंलडण्याचे प्रमाण वाढले आहे.२७ ऑक्टोंबरपुर्वी या मार्गावरील खड्डे न बुजविल्यास घाटरस्त्यामध्ये २७ ऑक्टोंबरला साखळी उपोषण करण्याचा इशारा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता.याशिवाय काही लोकप्रतिनिधीनी देखील या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या.त्यानुसार काल ता.२३ पासुन या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले.या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असल्यामुळे खड्डे भरताना वाहनांचा व्यत्यय निर्माण होत होता.त्यामुळे प्रधिकरणने घाटमार्गातील खड्डे बुजवुन होईपर्यत या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे घाटमार्गात कालपासुन वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एका बाजुची वाहने थांबवुन दुसऱ्या बाजुने येणारी वाहने आळीपाळीने सोडली जात आहे.त्यामुळे २५ ते ३० मिनिटांच्या प्रवासांसाठी आता तासभर लागत आहे.घाटमार्गात सध्या वाहनांची मोठी रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चौकट- पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता

करूळ घाटात फुट दीड फुट खोलीचे आणि पाच ते सहा फुट लांबी रूंदीचे खड्डे पडलेले आहेत.काही ठिकाणी रस्ताच शिल्लक राहीलेला नाही.त्यामुळे दहा किलोमीटर लांबीच्या या घाटमार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे.यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणच्या शाखा अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवु शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT