varandha ghat sakal
कोकण

Varandha Ghat : वरंधा घाट ३० मे पर्यंत राहणार बंद

महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट ते महाड दरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे वरंधा घाट ३० मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद राहणार आहे.

विजय जाधव

भोर - महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट ते महाड दरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे वरंधा घाट ३० मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद राहणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (ता.८) याबाबतचे आदेश जारी केला आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट ते महाड या महाडच्या हद्दीतील २१ किलोमीटरच्या अंतरापैकी ८ किलोमीटर रस्त्याच्या दुपरीकरणाचे काम सुरु आहे.

या टापूत खोल दरी, उंच डोंगर व अरुंद रस्ता असल्यामुळे आणि रस्त्याचे व संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावयाचे असल्यामुळे वरंध गाव ते वरंधा घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिस विभागाकडून अहवाल मागविल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिका-यांनी वरील आदेश दिले.

रस्ता बंद करण्यात आल्यामुळे महाडहून पुण्याला जाणा-या वाहनचालकांनी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हीणी घाट-मुळशी-पिरंगुट पुणे आणि महाड-पोलादपूर-अंबेनळी घाट-वाई मार्गे पुणे या मार्गाचा वापर करावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर या मार्गाचा अवलंब करावा असे रायगडच्या जिल्हाधिका-यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन पकडलं, अमित शहांची माहिती

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT