Uddhav Thackeray Narayan Rane
Uddhav Thackeray Narayan Rane 
कोकण

Vidhan Sabha 2019 : राणेंवरील टीकेने चिपळुणातील भाजप कार्यकर्ते नाराज

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवासी झालेल्या खासदार नारायण राणे यांचेवर केलेली टीका चिपळुणातील भाजप कार्यकर्त्यांना रूचलेली नाही. शहरातील मार्कंडी येथील भाजप कार्यालयात काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांचा निषेध केला. निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा निषेध केल्याने युतीत ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर जहरी टीका केली होती. दादागिरीचा प्रकार झाल्यास तोडून मोडून टाकण्याचाही इशारा दिला होता.

ठाकरेंनी राणेंवर केलेली टीका येथील भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. आज सकाळी भाजपचे साईनाथ कपडेकर, जगदिश वाघुळदे, अमीर बाचीम, इस्माईल मुकादम, श्री. परकार, आशिष जोगळेकर, श्रीराम शिंदे, संकल्प अव्हेरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा निषेध केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT