निलेश राणे यांच्या मोटारीची कणकवलीत झडती 

Police Check Nilesh Rane Motor
Police Check Nilesh Rane Motor

कणकवली - माजी खासदार निलेश राणेची कणकवली शहरात पोलिसांनी तपासणीसाठी गाडी अडवली असता, निलेश यांनी पोलिसांना दमदाटी केली. त्यांच्या शाब्दीक वादावादी झाली. 

मी कोणी बाहेरच्या राज्यातून आलेला नसून माझी गाडी तपासता म्हणजे काय? असे निलेश राणे यांनी त्यांना सुनावले. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व अन्य पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्धा तास निलेश पोलिसांशी हुज्जत घालत होते. पोलिसांनी ही तपासणी नेहमीची असल्याचे सांगत निलेश यांचे मन वळवले. अखेर राणे यांच्या मोटारीची झडती पोलिसांनी घेतली. त्यांंनंतर राणे यांना पोलिसांनी जाऊ दिले. 

दरम्यान या तपासणीत गाडीमध्ये काहीच संशयास्पद सापडले नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक शिवाजी कोळी यांनी दिली.

कणकवली मतदारसंघामध्ये निलेश यांचे बंधू नितेश हे भाजपकडून निवडणूक रिगणात आहेत. त्याच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. तसेच त्याच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेतली. यामुळे येथे शिवसेना व भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राणे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. 

दरम्यान, या मतदारसंघात चुरस वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टिने पोलिसांनी ताफा वाढवला आहे. मतदारसंघात गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com