कोकण

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या नितेश राणेंविरोधात शिवसेनेने दिला उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - शिवसेनेने कणकवली विधानसभा मतदार संघात भाजपच्या नितेश राणेंविरोधात सतीश सावंत यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे. श्री. सावंत यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर व सावंत यांनी तसे स्पष्ट केले. 

येथे काल भाजपने शिवसेनेचे पारंपारीक शत्रूत्व असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर शिवसेनेकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. राणेंच्या स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना येथून उमेदवारीची शक्यता होती. आज दुपारी याबाबतच्या हालचाली अधिक तिव्र झाल्या. काही वेळापूर्वीच शिवसेनेच्या एबी फॉर्मसह सावंत यांनी अर्ज दाखल केला. यामुळे कणकवलीची लढत तुल्यबळ आणि चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT