vinayak natu criticised on vinayak raut in chiplun ratnagiri 
कोकण

'कर्मदरिद्री खासदार नाहीत हे राऊतांनी पटवून द्यावे' 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : खासदार विनायक राऊत खासदार विनायक राऊत 'कर्मदरिद्री' खासदार नाहीत, हे त्यांनी पटवून द्यावे. त्यांना तसे संबोधणारे भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार पुन्हा चिपळुणात येतील. शिवसेनेने आडवाआडवीची भाषा करू नये, भाजप कार्यकर्ते शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्यास तयार आहेत, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी दिला. 

भाजपचे प्रदेश सचिव जठार यांनी चिपळूणचा दौरा करून खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. नाणार प्रकल्पासह कोकणातील रखडलेल्या विकासाला खासदार राऊत जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन जठार यांच्यावर निशाणा साधला होता. डॉ. नातू यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला आव्हान दिले. 

डॉ. नातू म्हणाले, खासदार विनायक राऊत 'कर्मदरिद्री' खासदार नाही, हे त्यांनी पटवून द्यावे. प्रमोद जठार भाजपचे नेते आहेत. ते पक्षाच्या कामानिमित्त चिपळुणात येणारच. रत्नागिरी जिल्हा सुसंस्कृत जिल्हा समजला जातो. येथे अडवाआडवीची भाषा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करू नये. चौपदरीकरणाचे काम वेगाने व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गुहागरमधील अनधिकृत जेटी जमिनदोस्त झाल्यानंतरही ती पुन्हा उभारण्यासाठी बंदरविकास खात्यामार्फत काही अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मी सरकारकडे केली. निकृष्ट पोषण आहारासंबंधी ठेकेदारावर कारवाईची मागणी मी सरकारकडे केली. 


दौऱ्यात सर्वांचीच निराशा.. 

चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना प्रकल्पाचा दौरा केला. या प्रकल्पाचे ते आधुनिकीकरण करणार आहेत. ते नक्की कशाप्रकारे प्रकल्पाचे आधुनिकीकरण करणार आहेत, हे त्यांनी कोणालाही सांगितले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात त्यांनी काहीच भूमिका मांडली नाही. त्यांना भेटण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. धावत्या दौऱ्यात त्यांनी सर्वांचीच निराशा केली, असे नातू यांनी सांगितले. 

..राऊत हे पहिलेच खासदार 

रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मग रत्नागिरी जिल्ह्यातीलच चौपदरीकरण का थांबले? खासदार म्हणून राऊत यांची भूमिका काय आहे? हे त्यांनी समजून सांगावे. आपला मतदारसंघ सोडून इतर मतदार संघातील विकासकामांसाठी पाठपुरावा करणारे राऊत हे पहिलेच खासदार आहेत. त्यांनी कृषी कायदा, नागरिकत्व कायदा आणि केंद्र सरकारशी संबंधित विषयावर जनतेचे प्रबोधन करावे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT