politics esakal
कोकण

'नारायण राणे म्हणजे खरा झारीतला शुक्राचार्य'; राऊतांचा घणाघात

कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा न्यायालयात जाऊन मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यायलच्या बाबतीत खरे झारीतले शुक्राचार्य हे जिल्ह्याचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नारायणा राणे आहेत, अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे. राणे यांचे नाव घेता शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग येथे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रीया दिली.

यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत खरे झारीतले शुक्राचार्य हे दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करणारे माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत. राज्यातील इतर जी काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सातारा, अलिबाग, पुणे यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅकल्टी चांगली आहे. असे असतानाही केवळ आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून आणि आपल्या स्वतःच्या कॉलेजवर त्याचा परिणाम होत आहे, म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अडचणी आणायचे काम केंद्रीय मंत्री करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी प्रयत्न करत आहे. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे याबद्दल उल्लेख केला आहे. संबंधित केंद्रातील मंत्र्यांशी बोलत असताना त्यांनीही अप्रत्यक्षपणे हा उल्लेख केला आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा आम्ही अपील करणार आहोत आणि न्यायालयात जाऊन मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT