कोकण

वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीतील त्रुटी दूर करणार; राऊतांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनकडून मान्यता मिळाली होती.

सावंतवाडी : एकदा मंजुरी मिळाल्यावर नामंजुरीचे पत्र येणे धक्कादायक आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आम्ही हार मानणार नाही. महाविद्यालय सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांच्या भल्यासाठी आहे. यामुळे केंद्राच्या समितीने अधोरेखित केलेल्या त्रुटींची लवकरच पूर्तता करू. यंदाच्या प्रवेशाला अडचण येणार नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनकडून मान्यता मिळाली होती. मात्र, अचानक प्रस्तावात त्रुटी दाखवून नामंजुरीचे पत्र देण्यात आले. पत्रात दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने आज ठळकपणे प्रसिद्ध केले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीसह अनेकांनी पत्राबाबत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे खासदार राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'महाविद्यालयाला 'एनएमसी'ने (ता. १७) ला मंजुरी दिली होती. यानंतर (ता. २१) ला 'एमएआरसी'ने मान्यता रद्दचे पत्र पाठविले. वास्तविक, 'एमएआरसी' ही कनिष्ठ यंत्रणा असून, ती 'एनएमसी'ला अहवाल देते. एकदा मंजुरी मिळाल्यावर पुन्हा त्रुटी काढणे धक्कादायक आहे. तरीही त्यांनी नमूद केलेल्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्रुटींमध्ये तीन मुद्दे आहेत. फर्निचर नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक, पावणेदोन कोटीचे फर्निचर आलेले आहे. स्वतंत्र परीक्षा कक्ष नसल्याचा मुद्दा आहे. आम्ही लेक्चर कम परीक्षा कक्ष केलेला आहे. सर्वसाधारणपणे अशीच व्यवस्था असते. आता आणखी एक परीक्षा कक्षासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. कायमस्वरूपी निवास व्यवस्था नसल्याचा मुद्दा आहे. अशी व्यवस्था असून, त्यात फक्त विद्युतीकरण बाकी आहे. त्याचीही पूर्तता लगेच केली जाईल.'

पुढे ते म्हणाले, 'काहीही झाले तरी हार मानणार नाही. मान्यता मिळवूनच देणार. हा प्रकल्प सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांच्या आरोग्याशी संबंधित आहे. येत्या आठ दिवसांत त्रुटींची पूर्तता केल्याचा अहवाल छायाचित्रांसह सादर केला जाईल. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेला काहीच अडचणी येणार नाहीत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT