Vinod Tawde Comment On JNU Case Ratnagiri Marathi News  
कोकण

जेएनयु प्रकरणावर विनोद तावडे म्हणाले, 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

ते म्हणाले, जेएनयू मध्ये 10 रुपयाची फी 600 रुपये झाली म्हणून विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चे काढले. त्याच विद्यापीठाच्या बाहेरील हॉटेलमध्ये जेएनयूचे विद्यार्थी महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये सिगारेट आणि पार्ट्यांसाठी खर्च करतात. ठाकरे सरकारमधील मंत्री गेट वे ऑफ इंडियावर मोर्चा काढून कश्‍मीर मुक्तीच्या घोषणा देतात. कॉंग्रेसने बाबरीचे समर्थन केले. राममंदिराला विरोध केला होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास कधीही परवानगी दिली नसती. ठाकरे सरकारमध्ये दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. शिवसेना भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नाराज झाले नसते. कारण शिवसेनेला पन्नास टक्के मंत्रीपद मिळाले असते. परंतु निवडणुकीच्या आधीच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठरले होते. आमच्याशिवाय सरकार होणार नाही, हे शिवसेनेला समजल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट सुरू झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना ठाकरे सरकारने बंद केल्या. जलयुक्त शिवारसारखी योजना बंद केली. हे दुर्दैवी आहे.

लोटस आॅपरेशन नाही

आमचे कोणतेही लोटस ऑपरेशन चालू नाही. कोणतीही गोड बातमी येणार नाही. ठाकरे सरकारला काम करण्याची पाच वर्ष संधी दिली जाईल. सरकारमधील खातेवाटप झाले आहे. त्यामुळे सरकारने आपला कारभार गतीमान करावा. खडसे नाराज आहेत. परंतु ते पक्षाचे नुकसान करणार नाहीत. 

- विनोद तावडे

एकाच विद्यापीठातून पदवी घेतली 

शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी एकाच विद्यापीठातून पदवी घेतली आहे. सामंत यांच्या डीग्रीबाबत निर्माण केलेली अफवा चुकीची आहे, सांगत तावडे यांनी सामंत यांची पाठराखण केली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दमाने घ्यावा असा सल्लाही त्यांनी जाधवांना दिला. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT