Mumbai-Goa National Highway Visava Point esakal
कोकण

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातला 'हा' पॉईंट पर्यटकांना घालतोय भुरळ, विहंगम दृश्य पाहून मन होतंय तृप्त

या ठिकाणी पोहोचल्यावर समोरील विहंगम दृश्य पाहून मन तृप्त होते.

सकाळ डिजिटल टीम

त्या रस्त्याने वरती गेल्यावर विकसित होणारा विसावा पॉईंट आणि पुढे गेल्यावर जुना पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो.

चिपळूण : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) विसावा पॉईंट कोकणात येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होता. आता चौपदरीकरणामध्ये नव्याने या पॉईंटची रचना करण्यात आली आहे. जुना डांबरी रस्ता नव्याने करून त्या ठिकाणी हे ठिकाण विकसित करण्यात आले आहे. येथील विहंगम दृश्य पाहून महामार्गाने प्रवास करणारे पर्यटक व प्रवासी येथे आवर्जून थांबून सेल्फीचा आनंद लुटत आहेत.

खेडकडे जाताना परशुराम घाटात (Parashuram Ghat) डाव्या हाताला जुना रस्ता जातो. त्या रस्त्याने वरती गेल्यावर विकसित होणारा विसावा पॉईंट आणि पुढे गेल्यावर जुना पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पोहोचल्यावर समोरील विहंगम दृश्य पाहून मन तृप्त होते. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने बसण्यासाठी बाकडे, चिरेबंदी पादचारी पथ तयार करण्यात येत आहे.

लवकरच या ठिकाणी झाडेझुडपे आणि शोभिवंत झाडांची लागवड केली जाणार असून, बाग तयार केली जाणार आहे. या ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंतीवर समोरून दिसणारे वाशिष्ठीचे विहंगम दृश्य चित्रकाराने चितारले आहे. त्याच पद्धतीने श्री परशुराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. तसेच वाशिष्ठी नदीतून होडी घेऊन जाणारा नावाडी, मगर अशी चित्रे या ठिकाणी साकारण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT