कोकण

खारेपाटणला तालुका निर्मितीची प्रतीक्षा

सकाळवृत्तसेवा

खारेपाटण - परिसरातील सुमारे ६० गावांतील नागरिकांची प्रशासकीय कामासाठी कणकवली आणि देवगड या तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यासाठी गेली अनेक वर्षे परवड सुरू आहे. कारण हे अंतर ५० ते ७० किलोमीटरचे आहे. काहींना तर उलट प्रवास करावा लागतो. ही वणवण थांबावी आणि खारेपाटण शहरासह लगतची गावे विकासाच्या नकाशावर यावीत, यासाठी स्वतंत्र खारेपाटण तालुक्‍याची मागणी मात्र शासनकर्त्यांकडून अनेक वर्षे दुर्लक्षित आहे.

कणकवलीसह वैभववाडी, देवगड तालुक्‍यातील ५० ते ६० गावांतील नागरिक ४५ वर्षांपासून स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी लढा देत आहेत; मात्र त्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. कणकवलीसह वैभववाडी, देवगड तालुक्‍याच्या वेशीवरील ५० ते ६० गावांतील नागरिकांना तहसील, न्यायालय व इतर कामांसाठी ५० ते ७० किलोमीटर अंतर पार करून तसेच एक ते दोन एस.टी. बसेस बदलून तालुक्‍याच्या ठिकाणी यावे लागते.

खारेपाटणच्या केंद्रबिंदूपासून ३५ ते ३५ किलोमीटर परिसरामध्ये तिथवली, नानिवडे, वेंगसर, कोळपे, उंबर्डे, भुईबावडा, नेर्ले-तिरवडे, चिंचवली, कोर्ले, पोंभुर्ले, कुणकवण, फणसगाव, उंडील, मणचे, मालपे, नाणार, तारळ, उपळे, कुंभवडे, बांधीवडे, प्रिंदावण, शेजवली, काजिर्डे, नडगिवे, वायंगणी, कुरंगवणे, बेर्ले, शेर्पे, साळीस्ते आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. अखंड रत्नागिरी जिल्हा असताना १९८० मध्ये स्वातंत्र्यवीर शंकरराव पेंढारकर यांनी सर्वप्रथम खारेपाटण तालुक्‍याची मागणी केली होती. त्यानंतर आजतागायत स्वतंत्र तालुका मागणीसाठी नागरिकांचा लढा सुरू आहे. 

खारेपाटण शहरालगत चिंचवली रेल्वे स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. पुढील वर्षीपासून या रेल्वे स्थानकात प्रमुख गाड्या थांबणार असल्याने खारेपाटणचे महत्त्व आणखीनच वाढणार आहे. याशिवाय पुरातन कालभैरव मंदिर, इतिहासकालीन बाजारपेठ अशी महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठिकाणेही खारेपाटण शहरात आहेत. तसेच प्रमुख बॅंका, सोसायट्या, पतसंस्था, हायस्कूल, महाविद्यालये, वीज उपकेंद्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालयही आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रमुख शहर, तसेच विजयदुर्ग खाडीतून येणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमुख केंद्र अशी खारेपाटण शहराची ओळख आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीनंतर खारेपाटणचं महत्त्व अधिकच वाढणार आहे. 
- कांताप्पा ऊर्फ सूर्यकांत शेट्ये, 

   सामाजिक कार्यकर्ते

विजयदुर्ग खाडीकिनारी असलेली अनेक गावे आज मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. तसेच इथल्या डोंगरदऱ्यातील ग्रामस्थांना तालुका ठिकाणी जाण्यासाठी अख्खा दिवस खर्च करावा लागतो.
-  प्रवीण लोकरे, 

    अध्यक्ष, शेठ न. म. विद्यालय खारेपाटण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT