The wall was hit by the waves devgad taluka konkan sindhudurg 
कोकण

दुर्लक्षपणाचा कळस!...अखेर लाटांच्या तडाख्यात `तो` खचला

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - उधाणाच्या लाटांच्या तडाख्याने तांबळडेग (ता. देवगड) येथील समुद्रकिनारी मासळी सुकविण्यासाठी बांधलेला कट्टा आज ढासळला. जोराच्या पाण्यामुळे समुद्रकिनारी धूप झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

उधाणाच्या लाटांमुळे तांबळडेग किनाऱ्याची धूप होत आहे. आज लाटांमुळे तांबळडेग येथील मासळी सुकविण्यासाठी बांधलेला कट्टा ढासळला. बांधकामाचा काही भाग जमीनदोस्त झाला. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तांबळडेग समुद्रकिनारी धूप होण्याचे प्रमाण वाढत असून भविष्यात समुद्रकिनारी असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण होऊ शकतो. या गावाच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूने खाडी, असा भाग आहे.

किनारपट्टीवर असलेली झाडे पाण्यामुळे समुद्राच्या कवेत जाण्याची शक्‍यता आहे. किनारपट्टीची धूप होत असल्याने ग्रामस्थांनी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी अशाच उधाणाच्या लाटांमुळे तेथील स्मशानभूमीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे वेळीच तांबळडेग गावात धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. 

मागणीकडे का दुर्लक्ष? 
तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्या भागात धूपप्रतिबंधात्मक बंधारा बांधण्याची मागणी झाली होती. अद्याप मागणीची दखल घेतली नसल्याची खंत काहींनी व्यक्त केली. आज तेथील मासळी सुकवण्याचा कट्टा ढासळल्याने मच्छीमारांना मासळी कुठे सुकवावी, असा प्रश्‍न पडला आहे. या भागात बंधारा आवश्‍यक असल्याचे मत सरपंच जगदीश मालडकर यांनी व्यक्त केले. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT