The wandering of the Katkari community stopped 
कोकण

कातकरी समाजाची भटकंती थांबली; मिळाले हक्‍काची घरे

संतोष कुळकर्णी

देवगड : आजवर विविध ठिकाणी भटकंती करून जीवन जगणाऱ्या कातकरी समाजाला शासनाच्या विविध योजनांमुळे स्थैर्यता आली आहे. तालुक्‍यात आजवर सुमारे 71 घरे शासनाच्या निधीतून कातकरी समाजासाठी बांधण्यात आली. घराबरोबरच वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा मिळाल्याने कातकरी समाजाच्या पुढील पिढीला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. 

कातकरी समाज एका जागी स्थिर नव्हता. पोटापाण्याच्या शोधार्थ त्यांची सतत भटकंती सुरू असायची; मात्र शासनाच्या शबरी आवास योजना आणि आदिम आवास योजनांमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तालुक्‍यातील मुणगे येथे 17 घरे, शिरगांवमध्ये 12, सौंदाळेमध्ये 17, वळीवंडेमध्ये 5, मोंडमध्ये 17, कुणकेश्‍वरमध्ये 3 अशी एकूण 71 घरे आतापर्यंत बांधण्यात आली आहेत. अजून मुणगेमध्ये तीन, दाभोळे येथे दोन तसेच मोंड, रहाटेश्‍वर, कुणकेश्‍वर येथे प्रत्येकी एक अशी आठ घरे प्रस्तावित असून लवकरच त्याचे बांधकाम होईल. 

स्वच्छतागृहासह प्रत्येकी दोन खोल्यांचे सुमारे 300 चौरस फुटाचे घर आहे. सुमारे एक लाख वीस हजार रूपये प्रतिघर यासाठी शासनाचा खर्च झाला आहे. याच्या जागेसाठी अर्ध्या गुंठ्यासाठी अधिकतम 50 हजारापर्यंत खर्च दिला गेला आहे. घरात विद्युत फिटींग करून देण्यात आले आहे.

पाण्याची सोय केली आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे कातकरी समाजाच्या दृष्टीने ही पर्वणी ठरली आहे. समाजाचे जीवनमान स्थिरावण्यासाठी यातून मदत होणार आहे. मुणगे येथील घरांची पहाणी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केली. यावेळी उपसभापती अमोल तेली, सहायक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष तथा किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर उपस्थित होते.

दृष्टिक्षेप 
- तालुक्‍यात 71 घरे शासनाच्या निधीतून बांधली
- घराबरोबरच वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा 
- स्वच्छतागृहासह दोन खोल्यांचे सुमारे 300 चौरस फुटाचे घर 
- सुमारे एक लाख वीस हजार रूपये शासनाचा खर्च 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT