Ward structure of Sawantwadi Vengurle Malvan Municipalities announced Oros esakal
कोकण

सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण पालिकांची प्रभाग रचना जाहीर

जिल्ह्यातील तिन्ही पालिकांचे निवडणूक बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले पालिकांच्या नव्याने केलेल्या प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. यावर हरकती असल्यास ता. १७ पर्यंत लेखी नोंदविण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. यामुळे जिल्ह्यातील तिन्ही पालिकांचे निवडणूक बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.

तीनही पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागवणे, सुनावणी घेणे कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने तिन्ही ठिकाणी प्रारूप प्रभाग रचना रहिवाशांच्या माहितीसाठी उपलब्ध आहेत. त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhusurg.nic.in या संकेतस्थळावर रचना प्रसिद्ध केली आहे. रचनेवर हरकत वा सूचना असल्यास संबंधितांचे सकारण लेखी निवेदन गुरुवारी (ता.१७) दुपारी तीनपर्यंत संबंधित मुख्याधिकाऱ्यांच्या नावे पाठवावे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे निवडणूक विभागाने जाहीर केले आहे.

या तिन्ही नगरपरिषदांच्या पंचवार्षिक मुदती डिसेंबर २०२१ मध्ये संपल्या आहेत. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. या तिन्ही नगरपरिषदांची सदस्य संख्या १७ वरून १९ केली आहे. दोन सदस्य वाढल्याने प्रभागांची नवीन रचना करणे बंधनकारक होते; परंतु कोरोनामुळे ते मुदत संपण्यापूर्वी झाले नव्हते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवीन प्रभाग रचना झाली. त्याचा प्रारूप आराखडा आज जाहीर झाला. हरकतींवरील सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत निघेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक जाहीर केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT