Warkari Corporation Statement to the prefecture office 
कोकण

अन्यथा मंदिरे खुली करणार

मुझफ्फर खान

चिपळूण  (रत्नागिरी) : किर्तन आणि प्रवचनातून आम्ही शासनाचा कोरोना संदर्भातील जनजागृती संदेश लोकांपर्यंत पोहचवू. आम्हाला नवरात्रोत्सवात मंदिरे खुली करण्याची परवानगी द्या. अशी मागणी वारकरी महामंडळातर्फे शासनाला करण्यात आली. येथील प्रांताधिकारी कार्यालयात यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. 


यासंदर्भात वारकरी महामंडळाचे कोकण विभागीय अध्यक्ष कोकरे महाराज म्हणाले, 17 ऑक्टोबरपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. आम्ही नवरात्र काळात सोशल अंतर ठेवून, मास्क वापरून तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करण्यास तयार आहोत. जिल्हाधिकार्‍यांनी आम्हाला चर्चेला बोलवावे. चर्चेतून अनेक गैरसमज दूर करता येतील. नवरात्रोत्सव काळात आम्ही किर्चन, प्रवचन करू. या माध्यमातून शासनाचे संदेश लोकांपर्यत पोहचवू.जिल्हाधिकार्‍यांनी 10 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला वेळ दिला नाही तर जिल्ह्यातील वारकरी समाज मंदिरे खुली करेल. आम्ही कायदा मोडला म्हणून जर कोणी आमच्यावर गुन्हे दाखल करणार असेल तर ते गुन्हे घेण्यास आम्ही तयार आहोत. 


राज्यात अनलॉक 5 मध्ये बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मग मंदिरे बंद का ? असा सवाल वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हा कार्यध्यक्ष अभयदादा महाज सहस्त्रबुद्धे यांनी विचारला आहे. धार्मिक स्थळे खुली करण्यासंदर्भात केंद्र सरकारने काही नियम व अटी लागू केल्या आहेत. त्यानूसार महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत. रत्नागिरी जिल्हा ग्रामदेवतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकार्‍यांनी नवरात्रोत्सवात 144 कलम लागू करून आमच्या धर्मावर घाला घातला आहे.

धार्मिकतेतून प्रतिकारशक्ती वाढते हे आम्ही नवरात्रोत्सवात सिद्ध करू. खेडचे तालुकाध्यक्ष शैलेश आंब्रे, अरविंद्र चव्हाण, दत्ताराम आयरे यांनीही मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. धार्मिक स्थळे समाजामध्ये चांगले विचार घडवायची मुख्य प्रणाली आहे. नवरात्रोत्सवात ती सुरू झाली पाहिजेत. 10 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक निर्णय द्यावा. नाही तर आम्ही मंदिरे खुली करू

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT