आ.प्रसाद लाड यांचे पुष्पगूच्छ देवून स्वागत करताना माजी आ.पाशा पटेल सोबत व्यासपिठावर अन्य मान्यवर sakal
कोकण

जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर बांबू शेती शिवाय पर्याय नाही - पाशा पटेल

१७ वी बांबू संधी, मुल्यवर्धन आणि विपणन कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

खेड : जागतिक तापमान वाढ ही दिवसेंदिवस धोकादायक पातळी ओलांडत आहे. ही तापमान वाढ रोखायची असेल तर बांबू शेती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि बांबू लागवड आणि प्रक्रीया मुल्यवर्धनाची चळवळ राबविणारे पाशा पटेल यांनी खेड येथे केले. अ‍ॅग्रोवन, एसआयएलसी आणि जिओ, लाईफ अ‍ॅग्रोटेक इंडिया प्रा.लि.च्या वतीने येथील द.ग.तटकरे सभागृहात आयोजित १७ व्या बांबू संधी, मुल्यवर्धन आणि विपणन या कार्यशाळेत श्री.पटेल बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रसाद लाड यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोकण बांबू केन डेव्हलपमेंट सेंटर चे संचालक संजीव करपे, बांबू कापड उद्योजक आशिष कासवा, जिओलाईफ अ‍ॅग्रीटेक इंडिया प्रा.ली.चे विक्री अधिकारी किरण थोरात, खेड भूमिपूत्र फार्मस प्रोड्युसर कंपनीचे नामदेव निकम यांच्यासह शेकडो शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.

यावेळी श्री.पटेल म्हणाले की, कोकणातील शेतकर्‍यांनी पारंपारिक भातपिक किंवा आंबा, काजू, नारळ या सारख्या फळबागांच्या उत्पादनावर अवलंबून न राहता वेगळी वाट चोखाळायला हवी. जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या दगडी कोळशासारख्या इंधनाला बांबू एक उत्तम दर्जेदार पर्याय ठरला आहे. बांबू पासून टूथब्रश पासून कपड्यांपर्यंत अशा सुमारे १८०० जीवन उपयोगी वस्तुंची निर्मीती करता येते. भारतात पूर्वोत्तर राज्यामध्ये बांबू पासून वेगवेगळी उत्पादने निर्माण करणारे उद्योग उभे राहीले आहेत. शेतकरी व उद्योगांनामध्ये असलेल्या कामगार वर्ग या दोन्ही वर्गाला यामधून अर्थाजन होत आहे. वाढत्या इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या काही महिन्यातच बांबू चा उपयोग करून इथेनॉल निर्मीती प्रकल्प सुरू होत आहे. अशा बहुपयोगी बांबूची शेती कोकणातील शेतकर्‍यांनी आपली आर्थिक उन्नत्ती करण्यासाठी केली पाहीजे.

भविष्यात मानव जात वाचविण्यासाठी बांबू हे एक हत्यार ठरेल. जगभरात कार्बन चे प्रमाण दिवसागणिक वाढत असुन, कार्बन चे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी यापुढे बांबू लागवड ही महत्वाची ठरणार आहे. शेतकर्‍याला व कामगार वर्गाला अर्थाजन करून देणारा बांबू हा निसर्ग वाचविण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.भविष्यात बांबू लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे दिर्घ मुदतीचे कर्ज देण्याच्या आम्ही विचाराधीन आहोत. यापुढे हवामान बदलामूळे कोकणातील बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोकणातील आंबा, काजू ला बांबू हा एक पर्याय ठरणार आहेत. असे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT