Warning of heat waves According to the message received from Indian Meteorological Department konkan marathi news 
कोकण

सावधान : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

राजेश कळंबटे

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते कुलाबा, मुंबई यांचेकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या माहितीनुसार  रत्नागिरी जिल्हयात 25 मार्च 2021 ते 27 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता  व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सलग दुसर्‍या दिवशी तापमानात मोठी वाढ झाली असून रत्नागिरीकरांना उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. दोन दिवसात पारा 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत वर गेल्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून उन्हाची तिव्रता जाणवत आहे.

डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापिठाच्या मौसम विभागाने चार दिवसांपूर्वी कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार दोन दिवस ढगाळ वातावरण होते; मात्र पाऊस झाला नाही. त्यानंतर बुधवारपासून सलग दोन दिवस जिल्ह्यात उष्मा वाढू लागला आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढत जात आहे. दुपारच्या सुमारास ही तिव्रता वाढत असून उष्माघाताची भितीही आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

यंदा उन्हाचा कडाक तीव्र राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मार्च महिन्यातील उन्हाचा कडाका लक्षात घेता मे महिन्यात त्यात मोठी वाढ होण्याची भिती आहे. दरवर्षी 36 अंशापर्यंत राहणारे तापमान यंदा मार्च मध्ये 37 अंशावर पोचले आहे. बुधवारी (ता. 24) रत्नागिरीत 37.5 अंश सेल्सिअसपर्यंत पारा होता. गुरुवारी (ता. 25) कमाल तापमान 37 अंशापर्यंत होते. उष्म्यापासून सुरक्षित राहण्यासाठी अनेकांची पावले आपसुकच फळांचे ज्युस विक्रेत्यांकडे वळत आहेत.

उन्हाच्या कडाक्याचा फटका आंबा पिकाला बसत आहे. कैरीच्या अवस्थेत असलेली फळ गळून जाण्याची भिती आहे. तसेच तयार झालेला आंबा आतून भाजत आहे. त्यामुळे दर्जावर परिणाम होत आहे. आंबा वाचवण्यासाठी झाडांना सतत पाणी देत रहावे असे आवाहन केले जात आहे.

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारी सर्वाधिक झळ बसून असून शक्यतो उन्हात जाणे टाळावे. बाहेर गेल्यास छत्री, टोपीचा वापर करावा. दिवसभर पाणी भरपूर प्यावे. उष्माघातासारखी लक्षणे वाटत असतील तर त्वरीत वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा. फळं, लिंबू सरबताचा पिण्यावर भर द्यावा.

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक


`बुवाची सौंदत्ती येथे ९ विद्यार्थ्यांसह नवे १६ रूग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. येथील ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच आरोग्य केंद्रात लसीकरण करून धोका टाळावा.

डाॅ मोहन भस्मे,तहसीलदार, रायबाग 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT