Kokan  sakal
कोकण

पुढील वर्षापासून विद्यापीठांमध्ये जलविषयक अभ्यासक्रम; सामंतांची घोषणा

दोन-तीन दिवसांत पत्रव्यवहार करू, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : पुढील वर्षापासून विद्यापीठामध्ये जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. माझ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फ राज्यभरात जलसाक्षरता व जलशक्ती अभियान राबवण्यात येईल. जिल्ह्यात पाणी वापर संस्था व जलदूतांची नेमणूक करून वर्षअखेरीपूर्वी जलपुरूष राजेंद्रसिंह राणा व जलनायक किशोर धारिया यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठात बैठक घेऊ. जलशक्तीसाठी सर्वपक्षीय राजकीय ताकद उभी करू. दोन-तीन दिवसांत पत्रव्यवहार करू, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीने अल्पबचत सभागृहात एक दिवसीय जलकार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, जलनायक किशोर धारिया, माजी आमदार बाळ माने, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी उपस्थित होते.

या वेळी मंत्री सामंत म्हणाले की, विद्यापीठात जलयुक्त अभ्यासक्रम करण्यासंदर्भात आताच कुलगुरुंशी बोललो. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनीही तयारी दर्शवली. ते अभ्यास करतील व पुढील वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होईल. या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनासाठी राजेंद्रसिंहांची तारीख घेऊन ठेवा. सर्वांनी एकत्र येऊन पाण्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेतली पाहिजे. पाणी वापर संस्था झालेल्या नाहीत, जलदूत नेमून झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करतो की, वर्षअखेरीपूर्वी आपण आपली परिषद विस्तारित बैठक ३१ डिसेंबरपूर्वी कोकण कृषी विद्यापीठात घेऊ. पाऊस व शेतीचा संबंध याबाबतीत नियोजन करू.

त्यांनी सांगितले की, जलसाक्षरता व जलशक्ती लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. माझ्या विभागात बारावीपुढील पदवी, पदव्युत्तरला ४२ लाख विद्यार्थी शिकत आहे. त्यांच्यामार्फत विद्यापीठ स्तरावर अभियान उच्च व तंत्रशिक्षण खात्यामार्फत राबवले जाईल. याकरिता तज्ञ द्यावेत, आमचा विभाग खर्च करेल. उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमत्र्यांच्या हस्ते व समाराोपाचा कार्यक्रम राजेंद्रसिंग यांच्या हस्ते करू.

पेंडसे समिताचा अहवाल

काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठकीला होतो. जिल्ह्यात धरण, कालव्यांसाठी १४०० कोटी रुपये आवश्यक आहेत. २००५ ला विधानसभेचे उपसभापती पेंडसे व माजी सचिव कै. भास्कर शेट्ये, डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी आमदार नाना जोशी, कल्पलता भिडे यांनी माझ्या माध्यमातून पिटीशन दाखल केले. त्यानंतर पेंडसे समिती स्थापन झाली. समितीने कोयना अवजल व नद्यांचा अभ्यास केला. त्यात उपाययोजना, जलउद्योग, त्यातून रोजगार निर्मितीसंदर्भात अहवालात दिले आहे. त्यासंदर्भातही विचारविनिमय करू, असे मंत्री सामंत म्हणाले.

बाळासाहेब मनावर घेत नाहीत...

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात राजकीय नेतेमंडळी एकत्र येतात. पण कोकणात येत नाहीत. परंतु आज संकल्प करतो मी व बाळासाहेब इथे आहोत. बाकीचे माझे मित्रपक्षच आहेत. आम्ही एकत्र आलो की पाण्यासाठी भल्याभल्यांना पाणी पाजू. पण बाळासाहेब मनावर घेत नाही. विनोदाचा भाग सोडा, असे मंत्री सामंत यांनी सांगितल्यानंतर सभागृहात हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT