Water scheme closed Tanker in Kushiwada due to contamination of Jambhi water 
कोकण

जांभीचे पाणी दूषित झाल्याने पाणी योजना बंदच ; पाण्याचे नमुने तपासणीसाठी

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील जांभी नदीत अज्ञाताकडून रसायन टाकण्यात आल्याने गेल्या चार दिवसापासून नदीतील पाण्यावर अवलंबून असणार्‍या पाणी योजना बंद आहेत. परिणामी कुशिवडे ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली होती. त्याची दखल घेत तालुका प्रशासनाने बुधवारपासून पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. दरम्यान, दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. 


तालुक्यातील येगाव, कुटरे येथून वाहणार्‍या जांभी नदीत चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने घातक रसायन टाकले होते. ही जांभी नदी कुशिवडेच्या पुढे गडनदीला मिळते. घातक रसायनामुळे नदीतील पाणी पांढरेशुभ्र झाले होते. तसेच नदीकाठी उग्र वासही येत होते. त्यामुळे पाणी पिण्यास दूषित झाल्याने नदीकाठच्या चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्यातील पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्या आहेत. तालुका आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रसायन मिश्रित पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा विषय ऐरणीवर आल्याने पाणी पुरवठा योजना बंद ठेवण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाने केली होती. त्यानुसार गेल्या चार दिवसापासून पाणी बंद आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने कुशिवडे सरपंच सिद्धार्थ कदम यांनी टँकरची मागणी केली होती. प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेतली. बुधवारपासून कुशिवडेत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आमदार शेखर निकमांनी सूचना दिल्यानंतर गडनदी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीतील दूषित पाणी माखजनच्या पुढे खाडीला जाऊन मिसळले आहे. पुन्हा पाणी पुरवठा सुरू करताना पाणी योजनांच्या जॅकवेलमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काही दिवस पाणी योजना आणखी बंद राहण्याची शक्यता आहे.


कुजबूज नदीकाठच्या गावांमध्ये सुरू

दरम्यान, जांभी नदीत अज्ञाताने नेमके कोणते घातक रसायन टाकले हे अद्याप उघड झालेले नाही. याविषयाची कुजबूज मात्र नदीकाठच्या गावांमध्ये सुरू झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT