wide highway
wide highway sakal
कोकण

देवगड : विमानतळाकडे जाणारे मार्ग हवे रूंद

संतोष कुळकर्णी

देवगड : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाजवळून सागरी महामार्ग जात असल्याने संभाव्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा विचार करता किनारपट्टीवरील रस्ते चांगले हवेत. यासाठी अनेक सुविधा महामार्गावर निर्माण होण्याची आवश्यकता आहे. विमानतळावर वेळेत पोचण्याच्या दृष्टीने आवश्यक तेथे महामार्गाचे रुंदीकरण आवश्यक बाब ठरणार आहे. पश्‍चिम किनारपट्टीवरील पर्यटन वाढीला भरघोस चालना मिळण्यासाठी पायाभूत सुविधांकडे विस्ताराने लक्ष केंद्रित करावे लागेल.

सागरी महामार्गाचा सिंधुदुर्गच्या दृष्टीने विचार करता देवगड तालुक्यातील आंबेरी येथून महामार्गास सुरुवात होते. येथील कुणकेश्‍वरमार्गे आचरा करून मालवण आणि पुढे वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावामध्ये त्याचा शेवट होऊन पुढे गोव्याच्या दिशेने महामार्ग सरकतो. जिल्ह्यातील रस्त्याची लांबी १५४ किलोमीटर इतकी आहे.

महामार्गावर छोटे-मोठे पुलांची लांबी साधारणतः सहा मीटरपासून ३० मीटर इतकी लांब आहे. महामार्ग काही ठिकाणी अरुंद आणि तीव्र वळणाचा भासतो. त्यामुळे नवख्या वाहनचालकांना वाहने हाकताना मोठी कसरत करावी लागते.

काहीवेळा आपण रस्ता तर चुकलो नाही ना? अशी शंका त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. कोकणचा विचार करता रायगडमध्ये मुरुड, नांदगाव, आदआव, धारावी, रत्नागिरीत वेसवी, बाणकोट, वेळास, पालशेत, रिळ, शिरगाव, मालगुंड, कशेळी, आडीवरे आदी पर्यायी रस्ता बांधणे आवश्यक ठरेल. अशीच स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्‍वर, कातवण, मिठबाव, केळुस, टाक, म्हापण गावांमध्येही भेडसावणार असल्याने यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील.

राज्य शासनाकडून महामार्गासाठी पॅकेजची घोषणा झाली असल्याने जिल्हावासीयांच्या आशा निश्‍चितच पल्लवीत झाल्या आहेत; मात्र विकासासाठी प्राधान्यक्रम लावणे आवश्यक बाब ठरेल. चिपी विमानतळाचा परदेशी पर्यटकांकडून

विमानतळाचे मार्ग हवेत रूंद

अधिक वापर होण्याच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीवरील या रस्त्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे लागेल. उत्तर भारतातील पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे तेथील पर्यटकांची कोकणला अधिक पसंती असते. अशावेळी रस्त्यांचे जाळे असल्यास पर्यटन वृद्धींगत होण्यास वेळ लागणार नाही.

रस्त्यांचे जाळे आवश्यक

सागरी महामार्गाचा मूळ गाभा पर्यटन आहे. त्यामुळे एका पर्यटनस्थळावरून दुसऱ्या पर्यटनस्थळापर्यंत पोचताना अनावश्यक वेळ वाया जाणार नाही, यादृष्टीने पर्यटकांची आखणी असते. परदेशी पर्यटक विमानाने चिपी विमानतळावर पोचल्यावर त्याचधर्तीवर त्यांना प्रवाशी वाहने लागतील. अशावेळी रस्त्यांचा विचार करता त्यांना जलद प्रवास करण्याची आवश्यकता भासेल. यासाठी रस्त्यांचे जाळे चांगले हवे.

रेल्वे स्थानकांनाही जोडणारे मार्ग हवेत

सागरी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे समांतर असल्याने सागरी महामार्गाबरोबरच रेल्वे स्थानके आणि विमानतळ जोडणारे रस्ते चांगलेच हवेत. अशावेळी पर्यटकांचा ओघ वाढून गोव्याप्रमाणे येथे पर्यटक स्थिरावू शकतील. यासाठी प्रयत्न गेरजेचे आहेत. परदेशी पर्यटकांचा रेलचेल वाढल्यास आपोआपच स्थानिक उलाढाल वाढेल.

सागरी महामार्गामुळे किनारपट्टीची गावे जोडली गेली. एकेकाळी वैभवसंपन्न असलेली कोकणातील बंदरे प्रवाशी बोट वाहतूक बंद झाल्याने ओस पडली. पूर्वी जयगड, मुसाकाझी-जैतापूर, विजयदुर्ग, देवगड आणि नंतर गोवा अशी बोट वाहतूक होती; मात्र बंदराना पुन्हा उर्जितावस्था आणायची असल्यास मुंबई ते मांडवाप्रमाणे बोटींची रो-रो सेवा सुरू करावी.

- प्रसाद पारकर, जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग

बंदरे सुधारण्याची नितांत गरज

रोरो सेवा सुरू झाल्यास पर्यटक वाहने घेऊन बोटीतून कोकणात इच्छितस्थळी जाऊ शकतील. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी बैठकीवेळी चर्चेदरम्यान बंदर विकासाचा मुद्दा मांडला होता. बंदरे सुधारल्यास बाजारपेठ सुधारेल आणि त्यांना गतवैभव प्राप्त होईल, असे पारकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT