कोकण

वकृत्वावर आपले प्रभूत्व असणे गरजेचे : साळगावकर

अमोल टेंबकर

सावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेवून तब्बल 23 दिवसात माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. आज ही त्यांची विधानसभेतील भाषणे संदर्भासाठी ऐकली जातात असे सांगुन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आठवणींना उजाळा दिला. 

येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा सह्याद्री फांउडेशनचे अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आज येथील गवाणकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राउळ, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, विभावरी सुकी, अण्णा केसरकर, संतोष सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस आदी उपस्थित होते. 

यावेळी साळगावकर म्हणाले वक्तृत्वात जादू असते समोर असलेल्या असंख्य लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद असते. त्यामुळे वकृत्वावर आपले प्रभूत्व असणे गरजेचे आहे. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या अनेक नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोक आतुरलेले असायचे आणि गर्दी करायचे ही आज ही वस्तूस्थिती आहे. नारायण राणे यांचे वक्तृत्वावर मोठी छाप आहे. त्याचाच फायदा घेवून ते फक्त 23 दिवसात आमदार बनले आणि त्यानंतर त्यांनी आपली मजल थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मानली आज ही विधानसभेतील त्यांची भाषणे म्हणून ऐकली जातात ही वस्तूस्थिती आहे त्यामुळे भविष्यात या ठीकाणी असलेल्या विद्यार्थ्यातून असा मोठा वक्ता घडावा अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री परब म्हणाले या ठिकाणी आता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता. भविष्यात जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येईल आणि नवोदीत विद्यार्थ्याना संधी देण्यात येईल. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सावंत तर आभार  गवस यांनी मानले यावेळी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी मोठी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT