कोकण

पर्यटकांना 'विकेंड सेलिब्रेशन' पडले महागात; आंबोलीत 50 जणांना दणका

अतिउत्साहीपणा करणाऱ्या जवळपास ५० जणांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले

सकाळ डिजिटल टीम

सावंतवाडी : जिल्ह्यात (sindhudurg district) अद्यापही वर्षा पर्यटन, धबधबे व अन्य पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झालेली नाहीत. असे असतानाही काही हौशी पर्यटकांनी आज विकेंड सेलिब्रेशनसाठी आंबोली वर्षा पर्यटनस्थळी (aamboli waterfall) हजेरी लावली; मात्र पोलिसांनी (police) त्यांना अटकाव केल्यामुळे त्यांना नाईलाजाने माघारी फिरावे लागले. अशातही अतिउत्साहीपणा करणाऱ्या जवळपास ५० जणांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची संख्या घटल्याने लॉकडाउन (lockdown) शिथिल करून अनलॉक प्रक्रिया सुरू केल्याने पर्यटकांना आता आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचे वेध लागले आहेत; मात्र निर्बंध शिथिल होत असले तरीही पर्यटनाला परवानगी दिलेली नाही. पर्यटकांना याची कल्पना नसल्याने तसेच माहिती असूनही काही अतिउत्साही पर्यटक (tourist) विकेंड सेलिब्रिशनसाठी रविवारी आंबोलीत दाखल झाले; मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर प्राशासनाचा ‘हाय अलर्ट’ असल्याने आंबोलीत आलेल्या पर्यटकांना माघारी परतावे लागले.

आंबोलीत आज पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद यांच्यासह जवळपास १२ पोलिसांची टिम बंदोबस्तासाठी तैनात होती. यापलीकडे जिल्हा वाहतूक पोलिसही होते. पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरच हा बंदोबस्त असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यांना नाईलाजास्तव माघारी परतावे लागले; मात्र परिस्थितीतही काही पर्यटकांनी अतिउत्साहपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली. जिल्हा वाहतूक पोलिस व सावंतवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. एन. तेली यांनी ही माहिती दिली. काही पर्यटकांनी कोरोनाचे नियम पाळले नव्हते. काहीजण विनामास्क होते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. पर्यटकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पोलिसांनी केले.

पर्यटन सुरू करण्याची मागणी

आंबोलीत पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने तसेच मागच्या रविवारी दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागल्याने आज आंबोलीमध्ये पर्यटकांचा ओघ काहीसा कमी होता. आंबोलीमध्ये दरवर्षी वर्षा पर्यटनाची रेलचेल असते; मात्र दोन वर्षांपासून येथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. वर्षा पर्यटन सुरू करावे, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

SCROLL FOR NEXT