pali.jpg
pali.jpg 
कोकण

विकेंड प्लॅनवर पावसाने सोडले पाणी

अमित गवळे

पाली : पावसाळ्यातील प्रत्येक शनिवार व रविवार पावसाळी पर्यटनासाठी हक्काचे दिवस असतात. मात्र जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे धबधबे कोरडे पडले आहेत. ओढ्यांचे व धरणाच्या सांडव्यांचे वाहते पाणी देखील कमी झाले आहे. परिणामी अनेकांचे विकेंडचे आखलेले बेत रद्द झाले.

जिल्ह्यात देवकुंड, आषाने कोषाने, झेनीत धबधबा अशा अनेक धबधबे व धरणक्षेत्रावर बंदी घातली आहे. मात्र तरी देखील व सुधागड तालुक्यातील घपकी, सिद्धेश्वर, कवेळे, कोंडगाव येथील धरणे व धबधबे तसेच पेण, खालापूर, महाड, मुरुड अलिबाग अशा अनेक ठिकाणचे सुरक्षित धबधबे आणि धरणांच्या सांडव्याखाली पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेतात. तसेच ताम्हणी घाटात देखील ठिकठिकाणी वाहणाऱ्या धबधब्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. मात्र मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पांढरेशुभ्र धबधबे गायब झाले आहेत. धरणांचे सांडवे देखील ओसंडून वाहत नाहीत, त्यात ऊन देखील पडत आहे. त्यामुळे विकेंडची मजा घेणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. काहींनी आपल्या विकेंडचा प्लॅन रद्द केला. तर काही जण पावसाळी पर्यटनासाठी निघाले मात्र कोरडे धबधबे आणि उन्हामुळे त्यांना भिजण्याचा आनंद लुटता आला नाही. उरलेल्या सुरलेल्या पाण्यात ते भिजत होते. व बाजूला बसून खाणेपिणे करत होते. अशा प्रकारे पावसाने दडी दिल्याने पर्यटकांना आपला विकेंड कोरडाच घालवावा लागला.


काही दिवसांपूर्वी रविवारी ताम्हणी घाटात वर्षा सहलीला जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र पाऊसच नसल्याने आमचा सर्व बेत रद्द करावा लागला. एकत्र जून महिन्यात पाऊसच नव्हता. आणि जुलै मध्ये थोडा पाऊस सुरू झाला आणि लगेच गायब झाला आहे. असेच राहिले तर शेतीवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.
- सुशील शिंदे, पर्यटक, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT