trains  sakal
कोकण

कोकण मार्गावर आता साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या

नाताळ सुटीसह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेने जाहीर

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : नाताळ सुटीसह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या ४ साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या १८ डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमाळी, करमाळी-पनवेल या गाड्यांचा समावेश आहे. पूर्णपणे आरक्षित असणाऱ्‍या या गाड्यांच्या ४२ फेऱ्‍या धावणार असल्यामुळे पर्यटकांना कोकणात येणे सुकर झाले.

थिविम-पनवेल (०१२९०-०१२८९) आठवड्यातून तीन दिवस धावेल. १८ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दर बुधवारी, शनिवारी व रविवारी थिविम येथून दुपारी १.३० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पनवेलला परतीच्या प्रवासात दर गुरुवारी, रविवारी व सोमवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी १ वाजता थिविमला पोहोचेल.

पुणे-करमाळी स्पेशल (०१२९१/०१२९२) १७ ते ७ जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी धावणारी ही गाडी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्‍या दिवशी सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर रविवारी करमाळीतून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. करमाळी- पनवेल (०१२९४/०१२९३) १८ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत दर शनिवारी धावेल.

करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून शनिवारी रात्री १० वाजता सुटून सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल.

१७ डब्यांच्या गाडीला रत्नागिरी, सिंधुदुर्गातही थांबे

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या गाड्यांमध्ये दादर-थिविम (०१२८७-०१२८८ ) साप्ताहिक स्पेशल १८ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत दर बुधवारी व शनिवारी धावेल. दादर येथून रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी दादरला पोहोचेल. १७ डब्यांच्या स्पेशल गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभवावाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आदी थांबे आहेत.

आणखी नियमित गाड्यांना मुदतवाढ

कोकण मार्गावर ३ नियमित गाड्यांना कोकण मार्गावरून धावणाऱ्‍या मांडवी कोकणकन्या एक्स्प्रेसपाठोपाठ आणखी नियमित गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दिवा-रत्नागिरी, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ डिसेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत धावेल. सावंतवाडी-मडगाव नियमित पूर्णपणे अनारक्षित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्मात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड; सलग दोन पराभव झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध आज सामना,पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update: महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT