What Is Role Of Shiv Sena In Five Star Hotel Project In Velagar  
कोकण

वेळागरमधील पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पात शिवसेनेची भूमिका काय?

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - शिरोडा वेळागर येथे प्रस्तावित पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ यांच्या आरोपांना शिवसेनेने उत्तर दिले आहे. 

शिरोडा-वेगळार येथील जमिन हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. त्याअनुषंगाने खासदार विनायक राऊत यांनी वेळागरमधील सर्वे क्रमांक 39 बाबत आपण भूमिपूत्रांसोबत आहोत असे म्हटले आहे. यावर जिल्हा परिषद सदस्य राऊळ यांनी शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य बालीश व दिशाभूल करणारे आहे, असा प्रतिआरोप रेडी शिवसेना विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर यांनी

प्रसिद्धपत्रकातून केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खासदार नारायण राणे हे जिल्ह्याचे नेतृत्व करीत होते. त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हुकुमशाही व दंडुकेशाही पद्धतीने हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे स्थानिक जनता पेटून उठली व संघर्ष समिती स्थापन झाली. त्याठिकाणी त्या नेतृत्वाच्या आदेशाने झालेला लाठीचार्ज व त्यामुळे भूमिपूत्रांना झालेल्या जखमा आजही ते विसरलेले नाहीत. त्यामुळे राऊळ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी खासदार राऊत यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न करु नये. भूमिपूत्राच्या जखमेवर मिठ चोळू नये. 

प्रकल्पाबाबत भूमिपूत्रांच्या समस्या व त्यांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा याबाबत खासदार राऊत यांनी वेळागर येथे जाऊन स्थानिक भूमिपूत्रांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री, आमदार आणि ताज ग्रुप यांच्याशी चर्चा करुन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मुद्दयांच्या अनुषंगाने पर्याय काढण्याचा प्रयत्न केला जाईल.त्यामुळे हा प्रकल्प योग्यरितीने तालुक्‍यातील लोकांना न्याय देऊन पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेना ही नेहमी प्रयत्नशील राहील. त्यामुळे राऊळ यांनी यात लुडबुड करु नये. 
- काशिनाथ नार्वेकर, शिवसेना रेडी विभागप्रमुख  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Googleचा नवा AI ‘Gemini 4 Argon’ लॉन्च; कोडिंगपासून सायबरसुरक्षेपर्यंत करणार मदत, जाणून घ्या किंमत

ROHIT SHARMA: ‘पुन्हा तीच भावना अनुभवायची आहे...’; २०२७ वर्ल्ड कपआधी रोहित शर्माचा मोठा खुलासा, शुबमन गिलच्या कॅप्टन्सीवरही बोलला

SCROLL FOR NEXT