0 
कोकण

कोकणातील कुठल्या जिल्ह्यात होणार घरोघरी व्याधीग्रस्तांचा सर्व्हे... वाचा सविस्तर

विनोद दळवी

ओरोस : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील गंभीर व्याधीग्रस्तांचा सर्व्हे करण्याचा आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेला दिला. राज्य शासनाने लॉकडाउनचे बहुतांश निर्बंध उठविले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हे करावा, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, कर्करोग व इतर गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेने यादी तयार करावी. त्यांच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आणि इतर रोग लक्षणांबाबत तपासण्या करून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात यावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. 

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी इमारतीच्या विविध विभागांची पाहणी केली. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, शाखा अभियंता व्ही. व्ही. जोशी, तसेच आरोग्य विभागाचे डॉक्‍टर व अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी त्या म्हणाल्या, ""कोरोना साथ रोगामुळे रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्रास होऊ नये, तसेच त्यांच्यावर उपचार करण्याच्या सुविधा परिपूर्ण असाव्यात, यासाठी यंत्रणा सज्ज असणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील गळती बांधकाम विभागाने तातडीने रोखावी.'' 

समन्वय अधिकारी नेमा 
के. मंजूलक्ष्मी यांनी आदेश दिले, की जिल्हा रुग्णालयातील स्वॅब चाचण्यांबाबत तातडीने समन्वय अधिकारी नेमावा, रोज सुमारे 250 चाचण्या होत आहेत. आरटीपीसीआर चाचण्या 150 व अँटिजेन टेस्टद्वारे सुमारे 100 चाचण्या होत आहेत. बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुरेसा पौष्टिक आहार देण्यावरही भर द्यावा. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आरोग्य यंत्रणेने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया गतीने राबवावी. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT