ambavde 
कोकण

डिक्की, बाटू या संस्थांनी कोकणातील कुठले गाव घेतले दत्तक.......वाचा

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीज (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा "डिक्की'चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी  आंबडवे येथे नुकतीच  केली. अशा पद्धतीने एखादे गाव दत्तक घेण्याचा महाराष्ट्रातील हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा. 

प्रत्येक घराला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे. या उपक्रमात संपूर्ण गाव आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने नियोजन केले असून, गावातील प्रत्येक घरात लघुउद्योग राबवून स्वयंरोजगाराची संधी निर्माण केली जाणार आहे. अगरबत्ती तयार करणे, सौर हातमाग, रुमाल तयार करणे आदींपैकी एक प्रकल्प व यंत्र प्रत्येक घराला देण्यात येणार आहे. यासाठीचा कच्चा माल खादी ग्रामोद्योग मंडळ पुरवणार आहे. तसेच यासाठीचे तंत्रप्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) देणार आहे. उत्पादित झालेल्या पक्‍क्‍या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी या संस्थांनी घेतली आहे. यामधून गाव आत्मनिर्भर होणार असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि देशात एक नवा आदर्श निर्माण होणार आहे, असे कांबळे यांनी सांगितले. या गावामध्ये 31 मागासवर्गीय कुटुंबे आणि 49 सर्वसाधारण वर्गातील कुटुंबे अशी एकूण 80 कुटुंबे आहेत. या सर्वांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष विनयकुमार सक्‍सेना यांनी दिली.

34 हजार चौरस फुटांचे सिमेंट पत्रे 
गावातील सर्व घरांसाठी 34 हजार 668 चौरस फूट सिमेंट पत्रे आणि प्रत्येक घरासाठी 433 चौरस फूट पत्रे, तसेच इतर साहित्य डिक्की संस्थेतर्फे देण्यात आले. प्रत्येक घराला जीवनावश्‍यक वस्तूंचे किट देण्यात आले. प्रत्येक कुटुंबासाठी सौर एलईडी दिवेही देण्यात आले.

या गावाच्या विकासासाठी विद्यापीठाचा कौशल्य व उद्योजकता विकास विभाग पूर्ण सक्रियपणे काम करेल. यासाठी विद्यापीठाकडून दोन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली. 

डॉ. वेदला राम शास्त्री, कुलगुरू, भारतरत्न डॉ. आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT